नवी दिल्ली : चेन्नई विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली आहे. विमानतळावर असलेल्या इंडिगो पॅसेंजर बसला अचानक आग लागली. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाहीये.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी सकाळी ही घटना घडली आहे. सकाळच्या सुमारास इंडिगोची बस प्रवाशांना सोडून विमानतळाकडे परतत होती. घटनेच्यावेळी बसमध्ये एकही प्रवासी नव्हता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.


घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.


आग नेमकी कशामुळे लागली याची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी इंडिगोकडून अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये.


प्रवाशांना विमानतळावर सोडण्याचं आणि पिकअप करण्याचं काम या बसच्या माध्यमातून केलं जातं. घटना घडली त्यावेळी बसमध्ये केवळ बसचालकच होता. आग लागताच चालक गाडीतून उतरला. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवलं.



विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना सोडून बस परतत होती त्यावेळी इंजिनमध्ये अचानक आग लागली. या घटनेत सुदैवानी कुणालाही दुखापत झाली नाही.