तिरुअनंतपुरम : ग्रामपंचायत कार्यालय असो किंवा संसद प्रत्येक ठिकाणी राजनितीक वाद होत असल्याचं पहायला मिळतं. प्रशासनाच्या कार्यालयीन बैठकीत अनेकदा लोकप्रतिनीधींमध्ये शाब्दिक बाचाबाची होते. तर, कधी हाणामारीही होते. आता असाच एक प्रकार समोर आला आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळमधील महानगरपालिका कार्यालयात सुरु असलेल्या बैठकीत एका विषयावरुन सदस्यांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की सदस्यांमध्ये हाणामारी झाल्याचंही पहायला मिळालं.


नगरसेवकांमध्ये हाणामारी सुरु असतानाच एक महिला नगरसेविका आली आणि तिने चक्क दुसऱ्या नगरसेवकाच्या कानशिलात लगावली. त्यानंतर मध्यस्थी करण्यासाठी इतर नगरसेविका सरसावल्या मात्र, त्यांनाही या नगरसेविकेने मारहाण केली.



महानगरपालिकेच्या बैठकीत झालेली ही हाणामारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.


ही घटना तिरुअनंतपुरममधील नेय्याटिंकरा मनपा येथील आहे. मनपात अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, बैठकीत सीपीएम आणि यूडीएफच्या नगरसेवकांत वाद झाला.
वादानंतर दोन्ही पक्षाचे नगरसेवकांत हाणामारी झाली.