मोदी सरकारमधील `या` मंत्र्याचा रामलीलेत अभिनय; व्हीडिओ व्हायरल
व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली: सध्या नवरात्रीच्या निमित्ताने देशभरात ठिकठिकाणी रामलीला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी दिल्लीतील लव-कुश रामलीला उत्सवाचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या रामलीलेत अनेक प्रसिद्ध कलाकारांनी अभिनय केला आहे. मात्र, या सगळ्यांपेक्षा राजा जनकाचे पात्र साकारणारा कलाकार सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन सिंह यांनी हे पात्र साकारले आहे.
हर्षवर्धन सिंह यांनी स्वत: ट्विट करून हा व्हीडिओ शेअर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, रामलीलेत राजा जनकाचे भूमिका साकारण्याचे सौभाग्य मला लाभले. लाल किल्ला आणि चांदनी चौकातील रामलीला महोत्सव पाहण्यात माझे बालपण गेले. मात्र, रामलीलेत प्रत्यक्ष भूमिका साकारण्याचा हा अनुभव कायमच माझ्या स्मरणार राहील, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.