दिल्लीच्या जुन्या राजेंद्र नगरमध्ये आरएयूच्या आयएएस कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या अपघातात तीन होतकरू विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला. हे तीन विद्यार्थी आयएएसच्या तयारीसाठी घरापासून दूर आले होते. या अपघातात श्रेया यादव, तान्या सोनी आणि नेविन डेल्विन यांचा मृत्यू झाला. जुन्या राजेंद्र नगर हे  IAS कोचिंगचे हब म्हणून ओळखले जाते. इथे देशभरातून असंख्य विद्यार्थी उराशी स्वप्न बाळगून येतात. पण या शिक्षणाच्या माहेरीघरी विद्यार्थ्यांना असंख्य संकटांचा सामना करावा लागतो. सध्या जुन्या राजेंद्र नगरमधील विद्यार्थ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसलंय. या आंदोलनातून त्यांनी या व्यथा मांडल्या आहेत. (Water from the tap only sewage no ventilation in the room IAS students in old Rajendra Nagar )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संतप्त विद्यार्थ्यांनी सांगितलं की, 90 टक्के ग्रंथालये केवळ बेस्ट मेंटमध्ये सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठलाही पर्याय नसून पहिल्या मजल्यावर चालणाऱ्या ग्रंथालयांचे शुल्क 6 ते 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. आंदोलन करणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितलंय की, इथले सर्व कोचिंग इन्स्टिटय़ूटच्या जागा भरल्या असून विद्यार्थी बाहेर पडल्यावर मेंढरासारखी होते. कधी कोणतीही घटना घडलं याचा काही नेम नाही. कोचिंग चालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी नाही, असा आरोपही एका विद्यार्थाने केलाय. त्याशिवाय हा स्टुडंट झोन असल्याने वीज बिलावर सबसिडी मिळावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केलीय. 


एका विद्यार्थ्याने सांगितलं की, आम्ही बाहेरून येतो, आम्हाला चांगल्या सुविधा मिळत नाहीत. लहान खोलीचे भाडे 15 ते 20 हजारांचा घरात आहे. विद्यार्थी इथे अत्यंत वाईट परिस्थितीत जगत असतात. येथील नळांमधून गटारीचे पाणी येते, मात्र त्याची जबाबदारी कोणी घेत नाही. ओआरएन म्हणजेच जुन्या राजेंद्र नगरमध्ये ज्या खोल्यांमध्ये दूरवरून शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी राहतात त्या खोल्यांमध्ये व्हेटिलेशनची सुविधा नाही. अशा ठिकाणांसाठी विद्यार्थ्यांना 20,000 रुपयांपर्यंत भाडे द्यावे लागते.


पार्किंग एरियामध्ये खोल्या 


एका विद्यार्थ्याने सांगितलं की, मी पार्किंग एरियात राहतो, मी माझ्या घरमालकाला अनेकवेळा सांगितलंय की येथे एक खड्डा आहे, तो बंद करा, त्यातून उंदीर आणि किडे येताच. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घरमालकाने पार्किंग क्षेत्राचे रुपांतर खोलीत केलंय. यात एक खोली आणि शौचालय आहे. त्याचे भाडेही 12 हजार रुपये आकारलं जात आणि विजेचे भाडे वेगळे असतं.