नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाची स्थिती फार गंभीर आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने शाळांना देखील काही दिवसांकरता सुट्टी जाहीर केली होती. आता दिल्लीची हवा त्याचबरोबर पाणी देखील अशुद्ध असल्याचे समोर येत आहे. केंद्र सरकारने देशातील २१ शहरांतील पाण्याची चाचणी केली. यामध्ये मुंबई शहरातील पाणी सर्वोत्तम असल्याचे निदर्शनास आले आहे.    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२१ शहरातील पाण्याची चाचणी १० मानकांवर करण्यात आली आहे. या मानकांमध्ये मुंबईच्या पाण्याला यश मिळाले आहे. केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी पाणी गुणवत्ता अहवाल आणि राँकिंग जारी केल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.    


यावेळी पासवान म्हणाले, 'कोणत्याही सरकारला दोष देण्याचा आमचा मानस नाही आणि या विषयावर आम्हाला कोणते राजकारण देखील करायचे नाही. लोकांपर्यंत स्वच्छ पाणी पोहोचावं असचं आमचं उद्दिष्ट आहे' त्यामुळे दिल्ली सरकारने समजून घेतले पाहिजे असं वक्तव्य पासवान यांनी केलं. 


शनिवारी पासवान यांनी पाण्यातील गुणवत्तेच्या आधारावर देशातील २१ शहरांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुंबई, हैदराबाद, भुवनेश्वर, रांची, आणि रायपूर उच्च क्रमाकांवर आहे, तर अनुक्रमे अमरावती, शिमला, चंदीगड, त्रिवेंद्रम, पटना, भोपाळ, गुवाहाटी, बंगळूर, गांधीनगर, लखनऊ, जयपूर, डेहराडून, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली आहे.