मुंबई : सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ समोर येत असतात, ज्यामुळे आपले मनोरंजन होते. एवढेच नाही तर हे व्हिडीओ आपल्याला बरंच काही शिकवून जातात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो आपल्याला माणसातल्या खऱ्या माणूसकीची ओळख करुन देतं. होय आपण बऱ्याचदा लोकांना बोलताना पाहिलं आहे की, माणूस इतका स्वार्थी झालाय की, त्याला आपल्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. या व्हायरल व्हिडीओने जगाला पुन्हा पटवून दिलं आहे की, माणूसकी शिल्लक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओत एका व्यक्ती आपल्या जिवाची पर्वा न करता गाईचे प्राण वाचवले आहे.


या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर पाणी तुंबलं आहे आणि गुडघाभर पाण्यातून लोक ये-जा करत आहेत. तेव्हा तेथून एक गाय देखील जाऊ लागली, परंतु तेथे जवळच असलेल्या इलेक्ट्रीकच्या खांब्यातून वीजपास होत असते. ज्यामुळे त्या गाईला शॉक लागतो. सुरुवातीला हा शॉक तसा कमी असतो, परंतु ही गाय जशी पुढे जाते तशी त्या शॉकची तीव्रता वाढते.


पुढे जाऊन गाईली शॉक सहन होत नाही आणि ती खाली पडते. या गाईच्या आजूबाजूने अनेक लोक जात असतात परंतु ते तिला वाचवण्यासाठी जराही प्रयत्न करत नाहीत.


तेव्हा तेथे जवळ असलेल्या दुकानदार त्या गाईला वाचवण्यासाठी पुढे येतो आणि युक्तीने गाईला त्यातून बाहेर काढतो.



हा व्यक्ती गाईच्या पायाला कपडा बांधतो आणि तिला मागे खेचतो. हे सगळं पाहून दुसरी एक व्यक्ती देखील त्याच्या मदतीला पुढे येते. ज्यामुळे या गाईचे प्राण वाचतात.


हा व्हिडीओ कुठला आहे, हे काही कळलेले नाही. हा व्हिडीओ ट्वीटरवर  Manviinsan या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.