बंगळुरू: आमचा चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा आकर्षक नसल्यामुळे प्रसारमाध्यमांकडून टेलिव्हिजनवर आमची भाषणे दाखवली जात नाहीत, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केले. ते मंगळवारी एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी दररोज उठल्यानंतर मेकअप करून चेहरा उजळवतात. हे सगळे सोपस्कार करून ते कॅमेऱ्यासमोर बसतात. मात्र, आम्ही सकाळी एकदा आंघोळ केल्यानंतर थेट दुसऱ्या दिवशी चेहरा धुतो. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर आमचा चेहरा फारसा चांगला दिसत नाही. त्यामुळेच प्रसारमाध्यमांकडून टीव्हीवर फक्त मोदींचीच भाषणे दाखवली जातात, असा आरोप कुमारस्वामी यांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांनी चित्रदुर्ग येथील सभेत काँग्रेस आणि जेडीएस सरकारवर निशाणा साधला होता. हे दोन्ही पक्ष स्वत:च्या स्वार्थासाठी सरकार चालवत आहेत. त्याचे परिणाम सगळ्यांना दिसतच आहेत, असे मोदींनी म्हटले होते. 



<iframe width="560" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>


गेल्या काही दिवसांमध्ये जेडीएस आणि काँग्रेसमध्ये सुप्त तणाव असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यावरून वेळोवेळी आपली नाराजीही व्यक्त करतात. कर्नाटक पिछाडीवर पडण्यासाठी नरेंद्र मोदी जबाबादार आहेत. राज्यात आम्हाला काम करायचे आहे. मात्र, मोदी सरकार त्यामध्ये अडथळे आणत असल्याचा आरोप कुमारस्वामी यांनी केला होता.