नवी दिल्ली : लडाख बॉर्डरवर चीनसोबत सुरु असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी, भारताला चीनशी मुकाबला करण्यासाठी तयार राहवं लागेल, असं विधान केलं आहे. जयशंकर यांचं हे विधान चीनसह होणाऱ्या 5व्या बैठकीपूर्वी आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, एस. जयशंकर यांनी, चीनसोबत संतुलन राखणं सोपं नसून भारताला त्यांचा विरोध करावा लागणार आहे. भारताला मुकाबल्यासाठी तयार राहावं लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी सांगितलं की, भारत-चीन बॉर्डरवरील कारवाईचा परिणाम व्यापारावरही होऊ शकतो. बॉर्डरवरील परिस्थिती आणि भारत-चीन संबंध हे विषय वेग-वेगळे ठेवले जाऊ शकत नाही, आणि हेच सत्य असल्याचंही ते म्हणाले. 


परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारत-अमेरिका संबंधांबाबत बोलताना, दोन्ही देशांतील संबंध बदलत असल्याचं सांगितलं. भारत-अमेरिका हे दोन्ही देश पारंपारिक मित्र नसले तरी आता दोन्ही देशांमधील संबंध बदलत असल्याचं चित्र आहे, असं ते म्हणाले.