नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी हरियाणामध्ये एका मुस्लीम व्यक्तीला बळजबरीने दाढी काढायला सांगितल्याच्या घटनेवरुन राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. एमआयएम पक्षाचे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी या घटनेबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. हरियाणामध्ये एका मुस्लीम माणसाला जबरदस्तीने दाढी काढायला लावली. मात्र, ज्यांनी हे कृत्य केले आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्ही आमचा गळा कापलात तरी आम्ही कधीच दाढी काढणार नाही. उलट एक दिवस आम्ही तुमचे धर्मांतर करु आणि तुम्हाला दाढी राखायला भाग पाडू, असा इशारा ओवेसी यांनी दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी ओवैसी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीका केली.


राहुल गांधींनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. ज्या माणसाविरोधात प्रस्ताव आणला त्यालाच जाऊन मोदींनी मिठी मारली. हेच मी मोदींशी साधे हस्तांदोलन केले असते तरी माझ्याविरोधात फतवा काढला असता. मात्र, राहुल गांधींनी मोदींची गळाभेट घेऊनही काँग्रेसने चकार शब्द काढला नाही, असे असुदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले.