बंगळुरु : बी.एस येदियुरप्पा यांच्यासाठी शनिवारचा दिवस खूप मोठा होता. पण 5 दिवसांपासून सुरु असलेल्या संत्ता संघर्षानंतर भाजपचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी फ्लोर टेस्ट आधीच राजीनामा दिला आहे. येदियुरप्पा यांनी आपल्या भाषणात पुढच्या रणनीतीचा उल्लेख केला. त्यानंतर ते राज्यपालांकडे राजीनामा देण्यासाठी निघून गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी विरोधी पक्षावर आरोप केला आणि बहुमत सिद्ध करण्याआधीच सत्ता सोडली. त्यांनी म्हटलं की, जनतेने आम्हाला 113 जागा दिल्या असत्या तर चित्र काही वेगळं राहिलं असतं. राज्यात ईमानदार नेत्यांची गरज आहे. आज माझी अग्निपरीक्षा आहे. मी पुन्हा जिंकून येईन. आम्ही 150 हून अधिक जागा निवडून आणू. राज्यातील प्रत्येक क्षेत्रात जाऊ आणि जिंकून येऊ. राज्यात लवकरच निवडणुका होतील.


येदियुरप्पा यांनी पुढे म्हटलं की, 'कर्नाटकात शेतकरी रडत आहे. जवळपास 3,700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जेव्हापर्यंत जिवंत आहे तो पर्यंत शेतकऱ्यांसाठी काम करत राहिल. आम्ही शेतकऱ्यांना जावून मदत केली. मागच्या सरकारवर नाराज जनतेने भाजपला मतं दिली. जनसेवेसाठी जीवन समर्पित करु इच्छितो'