Weather update :  गेल्या काही दिवसांपासून देशाच्या आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये थंडीचा कडाका कमी झाल्याचं पाहायला मिळालं. काही भागांमध्ये मात्र सोसाट्याचा गार वारा सुरुच होता. ज्यापासून आता नागरिकांना काशीही मोकळीक मिळणार आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 15 दिवसांपर्यंत देशाच्या बहुतांश भागांमध्ये कोरडे वारे वाहतील. काही भागांमध्ये प्रखर सूर्यप्रकाश असेल. बहुतांश भाग असेही असतील जिथं दिवसा तापमान 12 अंशाच्याही पलीकडे पोहोचू शकेल. अर्थात हे देशाच्या उत्तर भागासाठी लागू आहे, जिथं गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका दिवसागणिक वाढला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात पुढील 2 ते 3 दिवस गारठा वाढेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येणार असून, मुंबई, ठाणे, पुणे, नगरमध्ये याचे परिणाम दिसून येतील. 


 


पुन्हा एकदा पश्चिमी झंझावात सक्रीय 


हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार बुधवारपासूनच देशातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं. दिल्ली, महाराष्ट्रातही साधारण अशीच परिस्थिती होती. पण, पाऊस मात्र कुठेही झाला नाही. दरम्यान पुढील दोन दिवस ढगांचं सावट असंच राहील, काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसतील. तर, ताशी 10 ते 15 किमी वेगानं वारे वाहतील. पुन्हा एकदा पश्चिमी झंझावात सक्रीय झाल्यामुळं हवामानाचे रंग सातत्यानं बदलू शकतात. हे वारे हिमालयापर्यंत पोहोचत असल्यामुळं त्या भागात थंडीचा कडाका आणखी वाढणार असून काही भागांवर बर्फाची चादरही पाहायला मिळेल. 


मध्यप्रदेश आणि तामिळनाडूला पाऊस झोडपणार 


स्कायमेटच्या माहितीनुसार देशातील उत्तर पश्चिम मध्य आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये किमान तापमानात आणखी घट होऊ शकते. तर (Tamilnadu) तामिळनाडूतील दक्षिण भागासह केरळातील (Kerala) बहुतांश भागामध्ये मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी असू शकते. श्रीलंका (Srilanka) आणि तामिळनाडूतील समुद्रकिनारी भागामध्ये आज हवामानाची परिस्थिती बिघडू शकते. अनेक भागांमध्ये ताशी 50 किमी वेगानं वारेही वाहू शकतात. ज्यामुळं समुद्रात उंचच उंच लाटाही उसळतील. 


हेसुद्धा वाचा : Himachal Pradesh Snowfall: हिमाचल प्रदेशात बर्फाचं अक्षरश: वादळ, नळातील पाणीही गोठलं


तिथे मध्य प्रदेशातही अशीच परिस्थिती पाहायला मिळू शकते. पण, काही भागांमध्ये मात्र पावसाची हजेरी असेल असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. चंबलमधील काही भागांमध्ये दाट धुकं असेल. 


 


काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी आणि हिमस्खलन 


काश्मीर(Kashmir) , हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि उत्तराखंडच्या (Uttarakhand) बहुतांश भागांमध्ये बदललेल्या हवामानामुळं अनेक भागांमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. सोमवारपासूनच येथील बहुतांश भागांमध्ये बर्फवृष्टी सुरु आहे. तर, काही भागांमध्ये वाहतुकीसाठी वापरात असणारे रस्तेही बंद करण्यात आहेत. जम्मू काश्मीरच्या काही भागांमध्ये हिमस्खलनाच्याही घटना घडल्या आहेत.