मुंबई : सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे, ज्यामुळे सोशल मीडिया ओपन केल्या केल्या तुम्हाला लग्नाशीसंबंधीत काहीना काही व्हिडीओ पाहायला मिळतील. लग्नातील व्हिडीओ हे फारच मनोरंजक असतात. लग्नात सगळेच लोक मजामस्ती  करत असतात. परंतु सध्या जो सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लग्नात नववधू एक मोठी चुक करते. त्या घटनेचा आहे. जो पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले. चुका या सगळ्यांकडूनच होतात. परंतु काही वेळा त्याकडे लोकांचे फारसे लक्ष जात नाही. तर काही वेळी सगळ्यांसमोर चुक झाल्याने लोकांना लाजिरवाणे होते. अशीच एक घटना या लग्नामध्ये ही घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये नवरी दिसत आहे. ज्यामध्ये नवरी अशी काही चुक करते, ज्यामुळे उपस्थीत सगळ्यांना आणि मुख्यता नवऱ्याला मोठा धक्का बसतो. 


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरी आणि नवरा लग्नासाठी सप्तपदी करत आहेत. यादरम्यान काही फेरे झाल्यानंतर पंडीतजी तिला विचारतात. की, तुझे किती फेरे झाले? त्यावेळी नवरी फेऱ्यांबद्दल विसरते, तिला किती फेऱ्या झाल्या हे आठवत नाही आणि ती इकडे तिकडे पाहू लागते आणि 4 फेऱ्या झाल्या असे सांगते. त्यावेळी नवऱ्याचा चेहरा देखील पाहण्यासारखा असतो.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


नवरीकडून ही मोठी चूक झाली, कारण लग्नातच फेऱ्या विसरण्याला लोकं निष्काळजी पणाचे लक्षण मानतात. त्या क्षणी नववधूला मागून कोणीतरी 5 फेरे झाले असे सांगितले. तेव्हा तिने आपली चूक सुधारली आणि मग सगळ्यांना हसून म्हणाली, 'अरे पाचवा फेरा है, याद आ गया.'


लोक हा व्हिडीओ इंटरनेटवर शेअर करत आहेत. हा व्हिडीओ idontsaycheese ने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच लोक यावर भरभरुन कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडत आहेत.