मुंबई : लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात काही सुंदर क्षणांचे व्हिडीओ असतात, तर काही व्हिडीओ हे खूपच मजेदार असतात. सध्या सोशल मीडियावरती असाच एका नववधूचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. लग्नानंतर नववधूला आपलं माहेरचं घर आणि घरातील लोकांना सोडून लांब जावं लागतं, ज्यामुळे सहसा वधूचे डोळे पाणावतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण बऱ्याच नववधूला सासरच्या घरी जाताना रडताना पाहिलं आहे. परंतु सध्याचा व्हायरल होणारा नववधूचा व्हिडीओ हा सगळ्यांसाठी धक्कादायक आहे. ज्यामध्ये आपल्याला नववधूचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो.


खरेतर हा व्हिडीओ विदाईच्या वेळेचा आहे. ज्यामध्ये विदाईच्या वेळी नववधू इतकी रडू लागते की, कुटुंबातील सदस्यांना देखील तिला सावरता येत नाही. 


या नववधूला बहुतेक आपल्या माहेरच्या लोकांना सोडून सासरी जायचे नव्हतं, ज्यासाठी ती इतका हाय वोल्टेज ड्रामा करु लागली की, लोकांना जबरदस्ती तिला उचलून गाडीत बसवावं लागलं.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तिचा हा ड्रामा फारच मनोरंजक आहे. सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडीओ फारच आवडला आहे.


सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा घरातील सदस्य तिला जेव्हा कारमध्ये बसवत होते तेव्हा तिने आत बसण्यास नकार दिला. तरीही वधू सासरच्या घरी जावी म्हणून घरातील सदस्यांनी तिला कारच्या आत ढकलून त्यामध्ये बसण्यास भाग पाडले.


काही सेकंदांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर 69.flix नावाच्या अकाऊंटवरून अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला.