Wedding Card Viral : एका लग्नाचं आमंत्रण आपल्या सुंदर डिझाइनमुळे चर्चेत आले आहे. त्याला कारणही तसंच आहे. त्या पत्रिकेतील मचकूर आणि त्याची डिझाइन चर्चेता विषय बनला आहे. युझर्स @Vimal_Official_0001 द्वारे इंस्टाग्रामवरुन एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये चित्रविचित्र निमंत्रण कार्डामुळे लोक हैराण झाले आहेत. तसेच लोकांना या कार्डमुळे चिंता देखील वाटत आहे. एवढंच नव्हे काही लोकांनी या लग्नाला अतिशय मजेदार लग्न म्हणून देखील संबोधलं आहे. हे लग्नाचं कार्ड सामान्य विवाह सोहळ्याच्या निमंत्रणाची खिल्ली उडवत असल्याच देखील वाटत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लग्नपत्रिकेची सुरुवात अतिशय चित्रविचित्र वाक्याने होत आहे. "खतरनाक विवाह-निरागस वऱ्हाडी". यामध्ये "अमंगल गुटखा खाद्यम," "दुख्मनकम," आणि "सर्वव्यसनम" सारख्या विचित्र आणि गूढ वाक्यांचा समावेश आहे, जे पारंपारिक लग्नपत्रिकांच्या भाषेची नक्कल करतात.


हा विनोद वधू-वरांच्या नावांपर्यंत विस्तारतो. वधूचे वर्णन "दुर्दैवी-बिडी कुमारी उर्फ ​​सिगारेट देवी", तंबाखू लाल जी आणि सल्फी देवी यांची दुर्दैवी मुलगी, "420 यमलोक हाऊस, दुख नगर" मधील रहिवासी आहे. वराचे वर्णन तितकेच मनोरंजक आहे: "कर्करोग कुमार उर्फ ​​लैलाज बाबू," "गुटखा लाल जी आणि भगवान देवी यांचा दुर्दैवी मुलगा," जो "गलत रास्ता, व्यासनपूर (नशा प्रदेश) येथील आहे."



या सगळ्यासोबतच या पत्रिकेतील सर्वात न पटणारी गोष्ट म्हणजे लग्नाचे स्थळ. या पत्रिकेत सांगितलेल लग्न स्थळ आणि दुसरं म्हणजे लग्नाची वेळ. पत्रिकेत लग्नाचा स्थळ 'अनिश्चित' सांगितला आहे. तसेच निमंत्रणात 'परिणय सूत्र आत्महत्या बंधन' चा देखील उल्लेख केला आहे. यामध्ये तंबाखू किंवा गुटख्या सारख्या पदार्थांच्या सेवनाची जोखीम आणि शरीरासाठी घातक असलेल्या या पदार्थांचा देखील उल्लेख केला आहे.