नवी दिल्ली : गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी उत्तर भारतीय पर्यटकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.


पर्यटकांचं गोव्यात स्वागत मात्र...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्यात प्रत्येक पर्यटकाचं आणि नागरिकाचं स्वागत आहे. मात्र, गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी रस्त्यावर लघुशंका करू नये, तसेच कुठंही कचरा टाकू नये असं मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटलं आहे.


उत्तर भारतीय पर्यटक म्हणजे...


काही दिवसांपूर्वीच गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी उत्तर भारतीय पर्यटकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. उत्तर भारतीय पर्यटक म्हणजे पृथ्वीवरची घाण असल्याचं वक्तव्य विजय सरदेसाई यांनी केलं होतं.


विजय सरदेसाई यांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद


विजय सरदेसाई यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर विजय सरदेसाई यांनी म्हटलं की, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मी सर्वच पर्यटकांबाबत म्हणत नाहीये तर जे पर्यटक चुकीच्या पद्धतीने वागतात आणि राहतात त्यांच्या बाबत बोललो होतो.


कठोर शब्द वापरले


गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सरदेसाई यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गोव्यातील पर्यटन व्यवसायावर कुठालाही परिणाम होणार नाही. सरदेसाई यांनी कठोर शब्द वापरले मात्र, कुणालाही दुखावण्याचा तसेच वाद निर्माण करण्याचा त्यांचा कुठलाच हेतू नव्हता असेही मनोहर पर्रीकर यांनी म्हटलं आहे.


गोव्यात सर्वांचचं स्वागत...


भारतातील पर्यटकांनी पर्यटनासाठी गोव्यात नक्कीच यावे, सर्वांचचं गोव्यात स्वागत आहे. मात्र, गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी रस्त्यावर लघुशंका करू नये, तसेच कुठंही कचरा टाकू नये असे मनोहर पर्रीकर यांनी म्हटलं आहे.