कोलकाता : शिक्षक भर्ती घोटाळ्यात अभिनेत्री अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरावर ED ने धाड टाकली. यामध्ये ED च्या हाती भलमोठं घबाड लागलं. एवढं मोठं की मोजेपर्यंत अधिकाऱ्यांना घाम फुटला. हा मिळालेला ऐवज पाहून तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. नुसत्या 500 आणि 2000 च्या नोटाच नाही तर अजून बऱ्याच गोष्टी ED ला सापडल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ED ला अर्पिता मुखर्जीच्या घरी 2 हजार रुपयांचे बंडल सापडले. याशिवाय सोन्याची बिस्कीटं, ज्वेलरी, प्रॉपर्टीचे पेपर, परकीय चलन अशा बऱ्याच वस्तू सापडल्या. 2 हजार आणि 500 रुपयांच्या एवढ्या नोटा होत्या की मोजण्यासाठी अधिकची 5 मशीन मागवावी लागली. 


हा फ्लॅटही टीएमसी खासदार आणि बंगालचे शिक्षणमंत्री पार्था चॅटर्जी यांच्या अत्यंत जवळची व्यक्ती अर्पिता मुखर्जीच्या नावावर आहे. ED ने बुधवारी दुपारी या फ्लॅटवर धाड टाकली. त्यानंतर ED चे अधिकारीही जे दिसलं ते पाहून डोळे विस्फारून पाहात राहिले. या फ्लॅटमध्ये कोट्यवधी रुपये आणि सोनं-परकीय चलन अशा अनेक गोष्ट सापडल्या. 


पश्चिम बंगाल शिक्षक भर्ती घोटाळ्याची चौकशी करत असताना अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या फ्लॅटवर पोहोचली. हा फ्लॅट 24 परगणा इथला बेलघारिया क्लब टाउनमध्ये आहे. ED चे अधिकारी जेव्हा या घरी पोहोचले तेव्हा त्याला कुलूप होतं. अधिकाऱ्यांनी कुलूप तोडलं आणि त्यांना डोळ्यासमोर चमकणारे दागिने आणि नोटांचं घबाड दिसलं.


या नोटा फक्त खोलितच नाही तर टॉयलेटमध्येही ठेवण्यात आल्या होत्या. नोटा मोजण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांना 5 मशीन मागवावे लागले. 30 कोटी रुपयांच्या नोटा, 5 किलो सोनं जवळपास 4.31 कोटी रुपयांचं हे सोनं मिळालं आहे. याशिवाय प्रॉपर्टीचे कागदही सापडले आहेत. सोसायटीतल्या लोकांनाही हे घबाड पाहून मोठा धक्का बसला. कारण एवढे दिवस एवढा मोठा ऐवज इथे होता याची जराही कल्पना त्यांना नव्हती. 


20 कोटींची रोकड घेऊन जाण्यासाठी ट्रक मागवावा लागला. काही दिवसांपूर्वी ईडीला अर्पिता मुखर्जीच्या टालीगंजमधील फ्लॅटमधून 21 कोटी रुपये सापडले होते. ED ने अर्पिताच्या दोन घरांतून 50 कोटींहून जास्त रोकड जप्त केली. पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांना अटक करण्यात आली आहे. दोघेही 3 ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत.


आतापर्यंत या छापेमारीत 27.90 कोटींहून अधिक रक्कम वसूल झाली आहे. एकूण 3.41 किलो सोन्याची रिकव्हरी झाली असून त्यात 1-1 किलो वजनाच्या 3 सोन्याचे बार सापडले आहेत. तसेच अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाच्या 2 सोन्याच्या बांगड्या सापडल्या आहेत. ईडीच्या पथकाला सोन्याचे पेनही सापडले आहे. ही सगळी अफाट संपत्ती आणि पैसा कपाटात लपवून ठेवला होता.