पश्चिम बंगाल : दाट धुक्यामुळी भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ( West Bengal: 13 people died in an accident in Dhupguri city of Jalpaiguri ) तर 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जलपैगुडी जिल्ह्यात धुक्यामुळे हा अपघात झाला.



एका लग्न वऱ्हाडाच्या बसचा जलपैगुडी जिल्ह्यात जलढाका ब्रिजजवळ अपघात झालाय. मृतांमध्ये दोन पुरूष, सहा महिला, चार लहान मुलांचा समावेश आहे. तापमानात कमालीची घट झाल्याने पश्चिम बंगालमधील काही भागात पहाटेच्या सुमारास दाट धुकं पाहायला मिळत आहेत. यामुळे महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.