कोलकाता : मोदी सरकारचा संसदेत अर्थसंकल्प अरुण जेटली सादर करत असताना भाजपला पोटनिवडणुकीत जोरदार धक्का बसला. राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा सुपडासाफ झाला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलने निर्विवाद विजय मिळवत भाजपला जागा दाखवून दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम बंगालमध्ये उलुबेरिया या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार सजदा अहमद यांनी भाजप उमेदवार अनुपम मलिक यांचा ४ लाख ७४ हजार अशा विक्रमी मतांनी पराभव केला. तृणमूलने विधानसभेच्या एक जागेवरही विजय मिळविलाय.


एकीकडे अर्थसंकल्पातून २०१९ लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा होत असताना दुसरीकडे राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप जोरदार धक्का मिळाला.  पश्चिम बंगालमध्ये उलुबेरिया लोकसभा आणि नवपाडा विधानसभा पोटनिवडणुकीत मतमोजणीला सुरुवात झाली आहे.  त्यावेळी तृणमूलने आघाडी घेतली होती.  


दरम्यान, यावर्षीच राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, भाजपला हा मोठा झटका मानण्यात येत आहे.