ममता बॅनर्जी यांनी केली उमेदवारांची घोषणा, ४०.५ टक्के महिलांना दिले तिकीट
पश्चिम बंगालमधील उमेदवारांची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.
कोलकाता : लोकसभा निवडणूक २०१९ ची घोषणा झाल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा करण्याची सुरुवात केली आहे. सर्वात आधी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केली. त्यानंतर समाजवादी पार्टीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली. आता पश्चिम बंगालमधील उमेदवारांची घोषणा मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रसेच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या घरी बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी राज्यातील ४२ जागांची घोषणा केली. यात ४०.५ टक्के महिलांना स्थान देण्यात आले आहे. या महिला लोकसभेच्या उमेदवार असणार आहे. ममता बॅनर्जी यांनी महिलांना झुकते माप दिले असून त्याबाबत त्या म्हणतात आमच्यासाठी हा विषय गर्वाचा आहे.
ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीत ४०.५ टक्के टक्के महिलांना तिकीट जाहीर केली आहे. मंगळवारी त्यांनी ही घोषणा केली आहे. ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी बिजु जनता दलचे अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ३३ टक्के महिलांना तिकीट देण्याचे जाहीर केले होते. नुकतेच १७व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत निवडणूका होणार आहेत. राज्यात ४२ जागास असून इथे तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत असणार आहे. सात टप्प्यांत निवडणुकीवर तृणमूल काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
मुननुम सेन यांच्या उमेदवारीत बदल
आसनसोल येथून अभिनेत्री मुनमुन सेन, बीरभूममधून अभिनेत्री सताब्दी रॉय, इस्लामपूर येथून कनाईलाल अग्रवाल, अलीपूर दु्आर्स येथून दशरथ तिर्की, कूच बिहार येथून परेश अधिकारी, जार्जिलिंग येथून अमर रॉय आणि कृष्णानगर येथून महुआ मैत्री यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. २०१४ मध्ये अभिनेत्री मुनमुन सेन बंकुराची खासदार होती. या जागेवर बदल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल एक महत्त्वाचे राज्य म्हणून उदयास आले आहे. त्याचवेळी भाजपने राज्यात तृणमूलला आव्हान देण्यासाठी संपूर्ण ताकद लावली आहे.