बंगालमध्ये भाजपाच्या `विजय संकल्प रॅली`वर पोलिसांचा लाठीचार्ज
शालेय बोर्ड परिक्षा चालू असल्यामुळे या रॅलींवर बंदी घालण्यात आली आहे.
कोलकाता : राज्यातील अनेक ठिकाणी भाजपाच्या 'विजय संकल्प' रॅली थांबवण्यात आल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये रविवारी विविध ठिकाणी पक्ष कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. शालेय बोर्ड परिक्षा चालू असल्यामुळे या रॅलींवर बंदी घालण्यात आली आहे. रॅलींवर बंदी असतानाही कार्यकर्त्यांकडून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी पोलिसांनी रॅलीसाठी मनाई केल्याने कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.
भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये दुर्गापूर आणि पश्चिम बर्दवान जिल्ह्यातील आसनसोल, मिदनापुर शहर आणि पश्चिम मिदनापुरमधील गोआलतोर आणि दक्षिण दिनाजपुरच्या बालुरघाटमध्ये मोटारसायकल रॅली सुरू होत्या. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये काही लोक जखमी झाले.
भाजपाचे दिलीप घोष यांनी दुर्गापुरमध्ये पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतरही रॅली काढण्यात येण्याचे सांगितले. 'विजय संकल्प' मोटारसायकल रॅली भाजपच्या देशव्यापी लोकसभा निवडणूकांआधी संपर्क अभियानाचा एक भाग आहे.