कोलकाता : बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. भाजपच्या जागा वाढल्या असल्या तरी भाजपला सत्ता मिळवण्यात अपयश आलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने बहुमत मिळवत सत्ता राखली आहे. परंतु ममता बॅनर्जी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांना बंगालच्या जनतेने नाकारलं आहे. एमआयएमच्या 7 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुस्लीम मतदारांनी नाकारलं


असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्ष AIMIM च्या उमेदवारांना पश्चिम बंगालच्या सातही जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. 


असदुद्दीन ओवैसी हे मुस्लीम कार्ड खेळणारे राजकारणी मानले जातात. बिहारमधील मुस्लीम मतदार असलेल्या भागात त्यांनी उमेदवार उभे करुन इतर पक्षांचा खेळ खराब केला होता. पण पश्चिम बंगालमध्ये तसं झालं नाही. त्यांच्या कोणत्याच उमेदवाराला हजार मतंही पडली नाहीत.


बंगालच्या इतहार विधानसभा मतदारसंघात 52 टक्के मुस्लीम मतदार आहेत. पण AIMIM उमेदवार मोफाककर इस्लाम यांना 1000 मतं देखील मिळाली नाहीत. सागरदिघी मतदारसंघात 65 टक्के मुस्लीम मतदार आहेत पण नूरे महबूब आलम यांना 500 मतं ही मिळाली नाहीत. मालतीपूर मतदारसंघात 37 टक्के मुस्लीम मतदार आहेत पण मौलाना मोतिउर रहमान यांना 1 हजार मतं ही मिळाली नाहीत. रतुआ विधानसभा मतदारसंघात 41 टक्के, आसनसोल उत्तरमध्ये 20 टक्के तर जांगली मतदारसंघात 73 टक्के मुस्लीम मतदार आहेत. भरतपूरमध्ये 58 टक्के मुस्लीम मतदार आहेत. पण या जागांवर एआयएमआयएमच्या उमेदवारांना जास्त मतदान झालं नाही.