सौरउर्जेविषयी आपण शिकलो, त्यानं वापर केला; रणरणत्या उन्हात बनवलं Omlette; कसं झालंय? पाहा Video
Omlette on Terrace in Heat West Bengal: सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल (Viral Video) होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एक इसम चक्क भर उन्हात तव्यावर ऑम्लेट (Omette) करताना दिसतो आहे.
Viral Video Omlette West Bengal: कडक उन्हाचा आपल्यापैंकी सगळ्यांनाच कंटाळा येतो. उन्हाच्या झळा सोसणं हा आपल्या सर्वांसाठीच एक वेदनादायी (Man Makes Omlette in Heat) अनुभव असतो परंतु काही 'बुद्धिवान' लोकं मात्र याचा पुरेपूर चांगला वापर करून घेतात. अशाच एका हुशार पठ्ठ्यानं एक भन्नाट आयडिया वापरली आणि चक्क गच्चीत जाऊन त्यानं भर उन्हात ऑम्लेट बनवायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच हशा पिकला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Omlette Making Video) तूफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओ खाली नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत.
पुर्वी आपल्याकडे काहीच साधनं नव्हती म्हणून लोकांना बाहेर भट्टी लावून किंवा चुलीवर अन्न शिजवायचे, परंतु आज स्वयंपाक घरातीलही कितीतरी उपकरणं ही खूप एडव्हान्स झाली आहेत. आज आपल्याकडे अव्हन आहे, गॅस आणि शेगडी आहे परंतु या पठ्ठानं मात्र त्या सर्व गोष्टी नाकारून भर उन्हात जाऊन चक्क तव्यावर ऑम्लेट बनवलं आहे. त्याचं ऑम्लेट (Omlette Video) सविष्ट झालं का? हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ अगदी शेवटपर्यंत पाहावा लागेल. भर उन्हात ऑम्लेट होईपर्यंत हा पठ्ठ्या उन्हात उभा होता त्यामुळे त्याला यश आलं की नाही ते तुम्हाला हा व्हिडीओ पाहूनच कळेल. (west bengal youtuber fries an egg omlette on terrace in heat video goes viral)
नक्की काय केलं?
सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ भलताच चर्चेत आहे. हा व्हिडीओ बंगाली भाषेत आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, या माणसानं तवा खुल्या जागेवर ठेवला मग त्यावर कडक उन्हाचे कवडसे पडल्यानंतर त्याच ठिकाणी उन्हात तवा तापवत ठेवला. मग त्या तव्यावरच त्यानं एक अंड फोडलं आणि ऑम्लेट (Viral Omlette Video) करण्यासाठी ते पसरवलं. त्यातून ते अंड चक्क तयार झालं आणि मग ते त्यानं चाखून पाहिलं. ज्यात तो हे ऑम्लेट छान झाल्याचे सांगतो.
व्हिडीओ व्हायरल
@puchubabu या बंगाली युट्यूबरनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या त्याच्या प्रयोगाला नेटकऱ्यांचा तूफान प्रतिसाद लाभला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत 2.1 मिलियन व्ह्यूज फेसबुकवरून मिळाले आहेत. या भागात म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तापमान हे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थिती survive करण्याासाठी लोकांनी तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी करायला सुरूवात केली आहे. त्यातीलच एक प्रकार आहे असं म्हणायला हरकत नाही. या व्बिडीओखाली लोकांनी तऱ्हेतऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत.