Live In Relationship मध्ये शारिरीक संबंध ठेवता येतात? जाणून घ्या सर्वाच्च न्यायलयाचे नियम
Live In Relationship Rules: सध्या सगळीकडे लिव्ह इन रिलेशनशिप (live in relationship) हा शब्द ट्रेण्डिंग होत आहे. याला कारण म्हणजे श्रद्धा वालकर केस. सध्या रिलेशनशिप्स म्हटलं की या आधुनिक आणि पाश्चात्त्य संस्कृतीच्या रिलेशनशिप पद्धतीचं नावं हमखास समोर येतं.
Live In Relationship Rules: सध्या सगळीकडे लिव्ह इन रिलेशनशिप (live in relationship) हा शब्द ट्रेण्डिंग होत आहे. याला कारण म्हणजे श्रद्धा वालकर केस. सध्या रिलेशनशिप्स म्हटलं की या आधुनिक आणि पाश्चात्त्य संस्कृतीच्या रिलेशनशिप पद्धतीचं नावं हमखास समोर येतं. आजकाल अनेक तरूण - तरूणी लिव्ह इन रिलेशनशिप्सकडे वळतही आहेत. अनेकजण हा मार्ग स्विकारतानाही दिसतात. या रिलेशनशिपचे फायदे आणि तोटेही (live in relationship prons and cons) अनेक आहेत. आता हीच संस्कृती छोट्या छोट्या गावांमध्येही वाढायला लागली आहे. लग्नाशिवाय आपल्या पार्टनरसोबत (partner) राहणं म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. नातेसंबंधांच्या आणि प्रामुख्यानं वैवाहिक नातेसंबंधात एक नवा प्रयोग म्हणून याकडे पाहता आले. आजही या रिलेशनशिपमध्ये लोकं प्रयोग करताना दिसतात. लग्न करण्यापुर्वी एकमेकांना जाणून घेण्यासाठीही अनेक जण लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय निवडताना दिसतात आणि त्यानंतरही लग्नाचा विचार करतात. अनेकांना या रिलेशनशिपमधून समाधान मिळते तर अनेकांना मिळतही नाही. कायद्यानुसार लिव्हइन हा गुन्हा नाही. अशा जोडप्यांना सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) देखील मान्यता दिली आहे. (what are the supreme court rules to follow in live in relationship know more)
श्रद्धा वालकर (shraddha walker) आणि आफताब देखील याच नात्यात होते. त्यांनी भाडे करार करताना पोलिसांना पती-पत्नी असल्याचेही लिहून दिले होते. कदाचित श्रद्धालाही तिला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अधिकारांची माहिती नसावी? लिव्ह इन जोडप्यांसाठी न्यायालयाने काही नियमही ठेवले आहेत, त्यांचे पालनही करावे लागते. तेव्हा जाणून (rules) घेऊया या नियमांबद्दल...
दोन 18 वर्षे पूर्ण केलेले लोकं एकमेकांसोबत परस्परांच्या सहमतीने राहू शकतात आणि कायद्याने ते अनधिकृत नाही, असं कोर्टाने म्हटलेले आहे. अशा जोडप्यांकडे कोर्ट पारंपारिक लग्न केलेल्या जोडप्यांप्रमाणेच त्यांना पाहते. यासाठी त्यांना आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागते. अल्पवयीन मुलांना म्हणजे अठरा वर्षाखालील मुलांना यासाठी मान्यता नाही. लिव्ह इनला तेव्हाच मान्यता मिळते जेव्हा ते दोघं एकमेकांसोबत पती - पत्नी प्रमाणे राहतात. यासाठी ठरवीक कालावधी ठरवलेला नाही परंतु ते दोघं सतत एकमेकांसोबत असावेत. काही दिवसांसाठी एकत्र आले, मग पुन्हा वेगळे झाले अशा नात्यांना लिव्ह इनमध्ये मान्यता नाही. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेला पत्नीप्रमाणेच तिच्या सहकाऱ्याकडून पोटगीचा अधिकार आहे. कायदेशीर पती-पत्नी नसले तरी तिला या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही असं न्यायालयाने म्हटले आहे.
हेही वाचा - गुगल सीईओ Sundar Pichai यांना पद्मभुषण पुरस्कार देऊन सन्मान
शारिरीक संबंध ठेवता येतात का?
लिव्ह इनमध्ये असताना अपत्य झाले तर ते नाजायज नसते तर त्याला त्याच्या आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये पूर्ण अधिकार असतो. लिव्ह इनमध्ये असताना लग्नाचे वचन देऊन जर शारिरीक संबंध (physical relationships) प्रस्थापित झालेच आणि त्यानंतर जर त्यांनी लग्न केले तर तो गुन्हा मानला जातो. अशावेळी पीडित महिला किंवा पुरूष गुन्हा नोंदवू शकतो. विवाहित पुरुष किंवा महिला दुसऱ्या 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीसोबत राहत असेल तर तो गुन्हा होत नाही. परंतू जर त्याने किंवा तिने पहिल्या पती-पत्नीपासून घटस्फोट घेतला नसेल आणि दुसऱ्याशी लग्न केले तर हिंदू विवाह कायद्यानुसार तो गुन्हा ठरतो. अशा प्रकरणात इलाहाबाद आणि पंजाब उच्च न्यायालयांनी लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या दोन व्यक्तींना निर्दोष म्हटले आहे. लिव्ह इनमध्ये राहत असताना मारहाण झाली तर ती महिला पोलिसांत लग्न झालेल्या महिलेप्रमाणे घरगुती हिंसाचाऱ्याच्या अधिनियम 2005 नुसार गुन्हा दाखल करू शकते.