मुंबई : टाटा गृपचा एक शेअर मागील एका वर्षापासून बंपर रिटर्न देत आहे. गुंतवणूकदारांना या शेअरने मालामाल केले आहे. येथून पुढे सुद्धा या शेअरमध्ये जबरजस्त तेजी येण्याची शक्यता आहे. अनेक ब्रोकरेज हाउसने या शेअरसाठी Buy call दिला आहे.  TATA STEEL च्या शेअरनेही मागील तिमाहीत चांगले प्रदर्शन केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

का वाढतोय शेअर?
टाटा स्टीलचे प्रोडक्शन उत्तम राहिले आहे. मागील एका वर्षात कंसोलिडेटेड बाबींमध्ये कंपनीच्या स्टील प्रोडक्शनमध्ये 43 टक्के ग्रोथ झाली आहे. मजबूत स्टील प्रोडक्शनमुळे कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या शेअरची किंमत 1246 रुपये आहे. हा शेअर एका वर्षात 266 टक्क्यांनी वाढला आहे. ग्लोबल ब्रोकरेज फर्मने हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी 1462 रुपयांचे लक्ष देण्यात आले आहे.


देशातही चांगली ग्रोथ
टाटा स्टीलला देशातील चांगल्या विकासाचा फायदा झाला आहे. जूनच्या तिमाहीमध्ये कंपनीचे उत्पादन 55 टक्के वाढून 46.2 लाख टन इतके झाले आहे. 


परकीय बाजारातही टाटा स्टील चांगली कामगिरी करीत आहेत. त्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये येत्या काळातही वाढ होण्याची शक्यता आहे.