शालेय (School) जीवनात विद्यार्थी जेवढ्या उचापाती करतात त्या प्रत्येकाच्या कायमच स्मरणात असतातच. पण काही विद्यार्थी (Student) हे असेही असतात त्यांच्या एका कृतीने खूपच प्रसिद्ध होऊन जातात. पूर्वीही काही असे विद्यार्थी असतीलच पण त्यांच्या या उचापाती जास्त लोकांच्या समोर आल्या नसतील. पण सध्या सोशल मीडियाच्या (Social Media) जगात अशा कृती लगेचच व्हायरल (Viral) होतायत. अशाच एका विद्यार्थ्याने लिहिलेला निबंध (eassy) सध्या जोरदार व्हायरल होतोय. हा निबंध लिहून या विद्यार्थ्याने (Student) सर्वांना चकित केले आहे. हा निबंध सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. (What is marriage student wrote essay viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्न म्हणजे काय? (What Is Marriage) या विषयावर शिक्षकांनी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना निबंध (eassy) लिहिण्यास सांगितले होते. एका विद्यार्थ्याने लग्नाविषयी (Marriage) असं काही निबंध लिहिलाय की, जो चर्चेचा विषय बनला आहे. पण विद्यार्थ्याचा हा निबंध शिक्षकांना आवडला नाही आणि त्यांनी लाल पेनाने त्याला 10 पैकी 0 गुण दिले आहेत. यासोबतच त्यांनी इंग्रजीत Nonsense आणि मला येऊन भेट असेही लिहिले आहे.


काय लिहीलय निबंधात?


"लग्न तेव्हा होते जेव्हा मुलीच्या घरचे तिला सांगतात की तू आता 'मोठी' झाली आहेस, आम्ही तुला आणखी खायला घालू शकत नाही. तुझं पोट भरणारा मुलगा सापडला तर बरे होईल. आणि मग ती मुलगी एका माणसाला भेटते, ज्याचे आईवडील त्याला लग्नासाठी ओरडत असतात आणि म्हणत असतात की आता तू  मोठा झाला आहेस. दोघेही स्वतःची परीक्षा घेतात आणि आनंदी होतात. मग ते एकत्र राहायला लागतात," असं या विद्यार्थ्याने आपल्या निबंधात म्हटलं आहे.



दरम्यान, या निबंधाचा फोटो  @srpdaa या ट्विटर युजरने शेअर केला आहे. तसेच हा निबंध सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या ट्विटला साडेअकरा हजारांहून अधिक लाईक्स आणि दीड हजार पेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत. तसेच अनेक युजर्स यावर प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्सनी निबंध वाचून त्यांना हसू आवरता आले नाही असं म्हटलं आहे. बहुतेक युजर्सनी आम्ही 10 पैकी 10 मार्क दिले असते असं म्हटलं आहे. तर एका यूजरने , या मुलाला कोणीतरी पुरस्कार द्यावा, असेही म्हटले.