मुंबई : पनामा पेपर्स लीक हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण ED ने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला चौकशी करण्यात बोलावण्यात आलं. ऐश्वर्या सोमवारी ईडीच्या चौकशीकरता दिल्ली कार्यालयात पोहोचली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ED ने 48 वर्षीय अभिनेत्रीला 2016 मधील पनामा पेपर्स लीक प्रकरणाच्या चौकशीकरता सादर होण्यास सांगितले होते. 


तसेच या अगोदर ऐश्वर्याचे पती आणि अभिनेता अभिषेक बच्चनला देखील समन्स दिला आहे. या सगळ्या प्रकरणामुळे जाणून घेऊया पनामा पेपर्स काय आहे? आणि याविषयाशी संबंधीत अनेक गोष्टी? 


पनामा पेपर्स काय आहे?


2015 मध्ये, पनामा पेपर्स लीक प्रकरणात मॉसॅक फोन्सेका कंपनीची 11.5 कोटींहून अधिक कायदेशीर कागदपत्रे लीक झाली होती. ३ एप्रिल २०१६ रोजी एका जर्मन वृत्तपत्राने (SZ) पनामा पेपर्स या नावाने यासंबंधीची आकडेवारी जाहीर केली होती. 


या दस्तऐवजात भारतासोबतच जवळपास 200 देशांचे उद्योगपती, सेलिब्रिटी, नेते यांची नावे समाविष्ट करण्यात आली होती. या सर्वांवर मनी लाँड्रिंगचे आरोप होते. 


या दस्तऐवजात 1977 पासून 2015 अखेरपर्यंत माहिती असल्याचा दावा करण्यात आला आहे.


पनामा पेपर्समध्ये काय गुपित दडलंय?


या पेपरमध्ये संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या कथित बेकायदेशीर व्यवहारांशी संबंधित आर्थिक माहिती आहे. ज्यांनी करचुकवेगिरीसह आंतरराष्ट्रीय निर्बंध टाळण्यासाठी संबंधित कंपनीला पैसे दिले आणि त्याचा वापर बेकायदेशीर गुंतवणुकीखाली केला. 


'जॉन डो' नावाच्या अज्ञात व्यक्तीने हे कागदपत्र एका जर्मन वृत्तपत्राच्या पत्रकाराला दिले होते. जगभरातील बड्या व्यक्तींचा हा 'गुन्हा' जगजाहीर व्हावा, हा त्यामागचा त्यांचा हेतू असल्याचे बोलले जाते. 


या दस्तऐवजात पनामाचे नाव समाविष्ट करण्यावर पनामा सरकारचा तीव्र आक्षेप होता, त्यामुळे अनेक मीडिया हाऊसने त्याला 'मोसॅक फोन्सेका पेपर्स' असेही म्हटले.


पनामा पेपरमध्ये भारताच्या 'या' बड्या व्यक्तींची नावं? 


बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन, त्यांची सून ऐश्वर्या यांच्यासह भारतातील जवळपास 300 सेलिब्रिटींच्या नावांचाही यात समावेश होता. यामध्ये अभिनेता अजय देवगण आणि फरारी उद्योगपती विजय मल्ल्या आणि कुख्यात गुन्हेगार इक्बाल मिर्ची यांची नावे आहेत. 


इतकेच नाही तर भारताचे माजी सॉलिसिटर जनरल आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांचेही नाव त्यात होते. याशिवाय डीएलएफचे माजी सीईओ कुशल पाल सिंग, इंडियाबुल्सचे समीर गेहलोत आणि लोकसत्ता पार्टीचे दिल्ली शाखेचे माजी प्रमुख अनुराग केजरीवाल यांचीही नावे आहेत.


पनामा पेपरमध्ये सहभागी झालेल्या ग्लोबल लोकप्रिय व्यक्ती? 


पनामा पेपरमध्ये जगभरातील व्यक्तीच्या नावाचा देखील समावेश आहे. यामध्ये रशियाच्या राष्ट्रपती व्लादिमीर पुतिनचे जवळचे आणि महान फुटबॉलवर लियोन मेसीच्या नावाचा देखील समावेश आहे. 


तसेच आइसलँडचे माजी पंतप्रधान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ, युक्रेनचे माजी राष्ट्रपती पेट्रो पोरोशेंको आणि सऊदी अरबचे राजे सलमान बिन अब्दुलअजीज अल सौद यांचा देखील समावेश आहे. 


एवढंच नव्हे तर यामध्ये टायगर वुड्स आणि जॅकी चेन सारख्या वर्ल्ड सेलिब्रिटीचा देखील समावेश आहे. 


तसेच राष्ट्रपती शी जिपिंगच्या कुटुंबियांचे देखील ऑफशोर अकाऊंटमध्ये संबंध आहे.