CBSE Class 9 Chapter On Dating And Relationships : सध्याची तरुण पिढी रिलेशनशिप आणि डेटिंग गुरफटत चालली आहे. विविध कारणांमुळे अनेक रिलशनशिप तुटत आहेत.  ब्रेकमुळे अनेकजण डिप्रेशनमध्ये येत आहेत. आता मात्र, रिलेशनशीपमध्ये येण्याआधीच विद्यार्थ्यांना  रिलेशनशिप आणि डेटिंगचे शिकवले जात आहे. या धड्यांच्या माध्यमातून  विर्द्यार्थांना क्रश आणि स्पेशल फ्रेंडशिपमधला फरक समजावून सांगितला जात आहे.  CBSE  बोर्डाच्या इयत्ता नववीच्या पुस्तकात रिलेशनशिप आणि डेटिंग या धड्याचा समावेश करण्यात आल्या आहे. सध्या या धड्यातील मजकुर सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

CBSE  बोर्डाच्या इयत्ता नववीच्या पुस्तकात समावेश करण्यात आलेला रिलेशनशिप आणि डेटिंग वरील धड्यातील मजकुर सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. khushi नावाच्या तरुणीने X या सोशल मिडियावर प्लॅटफॉर्मवर @nashpateee या अकाऊंटवरुन या धड्याचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. शाळेत मुलांना हे सर्व शिकवण्याची काय गरज असे म्हणत अनेकांनी यावर टीका केली आहे. तर, अनेकांनी याची खिल्ली उडवली आहे. टिंडर या सोशल डेटिंग App ने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.


रिलेशनशिप आणि डेटिंगच्या धड्यात नेमकं आहे तरी काय?


रिलेशनशिप आणि डेटिंगच्या धड्यात विद्यार्थांना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. एक उत्तम नातं दोन गोष्टींवर अवलंबून असतं. एकमेकांचा आदर करणे आणि एकमेकांना प्रोत्सहित करणे असं सांगत या धड्याची सुरुवात करण्यात आली. दोन लोक रिलेशनशीपमध्ये कसे येतता. चांगले नातेसबंध कसे असतात.  याबाबत या धड्यामध्ये उदाहरणासहित सांगण्यात आले आहे. 


Ghosting, Catfishing आणि Cyberbullying म्हणजे काय याबाबत देखील माहिती देण्यात आली आहे. याचा नेमका अर्थ काय यात पार्टनरकडून कशा प्रकारे फसवणुक होण्याचा धोका असते हे देखील उदाहरणासहित सांगण्यात आले आहे. या धड्याची सोशल मिडियावर सध्या चांगलीच चर्चा आहे. अनेकांनी हा धडा पाहून डोक्याला हात लावला आहे. 



Tinder या डेटिंग App ची भन्नाट प्रकतिक्रिया


CBSE  बोर्डाच्या पुस्तकात रिलेशनशिप आणि डेटिंग या धड्यावर Tinder या डेटिंग App ने भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. तरुण वयात झालेले प्रेमसंबध अनेकदा तुटतात. पुस्तकात  रिलेशनशिप आणि डेटिंगचे धडे दिलेत. आता ब्रेक झाल्यावर स्वत:ला कसं सावरायचे यावर देखील धडा शिकवा अशी कमेंट Tinder India ने केली आहे.