नवी दिल्ली : केंद्र सरकारकडे सर्व नागरिकांची यादी असते. ती यादी वेळोवेळी अपडेट करावी लागते. त्यामुळे १० वर्षांनंतर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Register - NPR) च्या अपडेशनला कॅबिनेटनं मंजुरी दिली खरी, मात्र आता त्यावरूनही वाद रंगलाय. नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, अर्थात एनपीआरचं अपडेशन करण्यात येणार आहे. जनगणनेशी निगडीत असलेल्या या रजिस्टरमध्ये देशातल्या तमाम नागरिकांची माहिती आहे. ते कुठे राहतात, काय करतात इथपासून ते त्यांचा रेटिना स्कॅन, फिंगर प्रिंट्स अशी सगळी माहिती अपडेट होणार आहे. त्यासाठी साडे आठ हजार कोटी खर्च अपेक्षित असून त्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही यादी जुनीच असली आणि आता केवळ तिचं नुतनीकरण होणार असलं तरीही सध्या सुरू असलेल्या CAA (Citizenship Amendment Act ), NRC (National Register of Citizens) विरोधी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडे वेगळ्या नजरेतून पाहिलं जातंय. हा निर्णय  NRC लागू करण्याच्या दिशेनं उचललेलं पहिलं पाऊल असल्याची टीका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी यावर टीका केलीय. मात्र, NPR ची अंमलबजावणी काँग्रेस सरकारच्या काळात झाली होती. त्यावेळी ओवेसी हे काँग्रेससोबतच होते. त्यांनी तेव्हा हा प्रश्न का विचारला नाही? असा सवाल भाजपनं केलाय. नागरिकत्व कायद्यातील दुरूस्ती, एनआरसी आणि एनपीआर यामध्ये बराच फरक आहे. देशात राहणाऱ्या नागरिकांची संपूर्ण माहिती सरकारकडे असणं आवश्यकही आहे. त्यामुळे यालाही सुरू झालेला विरोध केवळ राजकारणासाठीच असल्याचं दिसतंय.  


अधिक वाचा - राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


अधिक वाचा - नागरिकत्व सुधारणा कायदा : संभ्रम की राजकारण?


अधिक वाचा - #CAA ची अंमलबजावणी सुरु; तीन पाकिस्तानी तरुणांना भारतीय नागरिकत्व


देशात एनसीआरवरून वाद सुरु असताना आता एनपीआर म्हणजेच राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर राबवण्यात येणार आहे. त्यावरून वादही होतोय. पण या दोन्हीमध्ये काय फरक आहे जाणून घेऊयात...



एनआरसी आणि एनपीआरमध्ये फरक काय?


राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC - National Register of Citizens)


१. एनआरसी देशांतील घुसखोरांना शोधण्यासाठी


२. एनआरसीमुळे कोणत्याही धर्माच्या घुसखोरांची ओळख कळणार


३. एनआरसी संपूर्ण देशात लागू करण्याची योजना


४. एनआरसीमध्ये शेजारी देशांमधून आलेल्या घुसखोरांवर कारवाई


राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR - National Population Register)


१. एनपीआर देशांत राहणाऱ्या नागरिकांच्या माहितीचं रजिस्टर


२. एनपीआरमध्ये देशातील नागरिकांची ओळख पटवून माहिती संकलन होते


३. एनपीआरमध्ये देशात्या प्रत्येक नागरिकाला नोंदणी करावी लागते


४. एनपीआरमध्ये एका ठिकाणी सहा महिन्यांपेक्षा अधिक वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना नोंदणी करणं आवश्यक