पंतप्रधान नरेंद्र मोदी गाडीत बसल्यावर पहिलं काय करतात?
व्हिडिओ होतोय व्हायरल
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील सर्वात मोठे सोशल मीडिया स्टार आहे. युवा भारताचे हे असे पंतप्रधान आहे जे सोशल मीडियावर भरपूर अॅक्टिव्ह असतात. मोदींच्या रूटीनपासून ते अगदी त्यांच्या पेहरावापर्यंत सामान्य नागरिकांना सगळं जाणून घ्यायचं असतं. आता मोदींचा एक व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पीआयबीने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओत मोदी एक खास गोष्ट करत आहेत जिथे सगळ्यांच लक्ष वेधलं आहे.
मोदी गाडीत बसल्यावर पहिलं काय करतात?
मोदींच्या सगळ्या गोष्टींकडे लोकांच बारीक लक्ष असतं. या व्हिडिओत मोदी गाडीत बसताच सीट बेल्ट लावताना दिसत आहे. ट्रॅफिकचे सर्व नियम मोदी फॉलो करताना दिसतात. आणि याची चर्चा कायम होत असते. पीआयबीने रस्त्याची सुरक्षाबाबत जागरूकता निर्माण करण्याकरता हा व्हिडिओ शेअर केला आहे. आपण देखील रोड अपघात टाळू इच्छिता तर हा नियम सर्वात पहिला पाळला पाहिजे.
पीआयबीने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी कारमध्ये बसताच आपला सीट बेल्ट लावतात. तुम्ही असं करता का? त्यानंतर त्यांनी लिहिलं आहे की, सीट - बेल्ट जरूर लावा आणि सडक सुरक्षा जीवन रक्षा असा हॅशटॅग देखील दिला आहे.