What is PFI : संपूर्ण देशाची नजर रोखणाऱ्या एनआयएनं पुन्हा एकदा त्यांच्या कारवाईतून एक मोठा डाव उधळून लावल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातल्या कार्यालयांवर आज  (गुरुवारी) एनआयए (National Investigation Agency- NIA) आणि ईडीने (ED) छापे सुरू केले. या कारवाईअंतर्गत देशभरातून NIA आणि ED नं 100 जणांना ताब्यात घेतलं आहे. (NIA Arrest PFI Leaders)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

PFI म्हणजे काय, त्यांचं काम तरी काय असतं? का ताब्यात घेतली जात आहेत या संघटनेची माणसं 
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही एक इस्लामिक संघटना आहे. ही संघटना आपल्या समुदायातील मागासवर्गीय आणि मागे पडलेल्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी काम करते. 2006 मध्ये नॅशनल डेवलपमेंट फ्रंट (NDF) ची उत्तराधिकारी संघटना म्हणून स्थापन करण्यात आली. या संघटनेची मुळं केरळच्या कालिकतशी जोडली गेली आहेत. (what is the meaning and work of PFI question raised after NIA ATS ED raid)



सध्याच्या घडीला या संघटनेचं मुख्यालय (Delhi) दिल्लीतील शाहीन बाग येथे असल्याचं कळत आहे. शाहीन बाग हा तोच भाग आहे, जिथं CAA आणि NRC विरोधात देशभरातून 100 दिवसांचं प्रदीर्घ आंदोलन पुकारण्यात आलं होतं. 


अधिक वाचा : दहशवाद संपवण्यासाठी NIA ची स्थापना, कशी मिळवाल नोकरी? वाचा सुविधा आणि वेतन


 


(Islam) इस्लामिक संघटना असल्यामुळं PFI चं बहुतांश काम या समाजाभोवती फिरताना दिसतं. अनेकदा या संघटनेशी संलग्न व्यक्ती मुस्लिम आरक्षणासाठी रस्त्यांवर उतरून आंदोलनं करतात. 


संघटनेचं काम देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं धोक्याचं? 
2012 मध्ये केरळ सरकारनं एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान न्यायालयात अतिशय लक्षवेधी विधान मांडलं होतं. PFI ची कामं देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं धोक्याची असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं होतं.