मुंबई: तुम्हाला बँकेतून एखादे कर्ज काढायचे असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तर ग्राहकांकडून हमखास कॅन्सल चेक मागितला जातो. आपणही प्रक्रियेचा भाग म्हणून फारसा विचार न करता इतर कागदपत्रांसोबत कॅन्सल चेक जमा करतो. परंतु, हा कॅन्सल चेक नेमका कशासाठी लागतो, याचे कारण अनेकांना माहिती नसते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅन्सल चेक का जमा करावा लागतो? 
ग्राहकाचा बँकेचा खाते क्रमांक, आयएफएससी कोड अशाप्रकारची प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी कॅन्सल चेकचा वापर होतो. 
 


काय आहे कॅन्सल चेक?


एखाद्या चेकवर दोन तिरप्या समांतर रेषा मारून त्यामध्ये इंग्रजी भाषेत CANCELLED असे लिहल्यास संबंधित धनादेश कॅन्सल चेक म्हणून गणला जातो. कर्ज, भविष्य निर्वाह निधी यासारख्या महत्वाच्या व्यवहारांसाठी कॅन्सल चेक द्यावा लागतो. 


कॅन्सल चेकचा उपयोग काय ?


तुम्हाला कॅन्सल चेकवर स्वाक्षरी करण्याची आवश्यकता नसते. कॅन्सल चेकच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचा बँक खाते क्रमांक, एमआयसीआर, आयएफएससी कोड आणि बँकेची शाखा अशी प्राथमिक माहिती मिळते. 


कॅन्सल चेकचा वापर करून तुम्ही खात्यातून कोणताही रक्कम काढू शकत नाही. जर तुमची स्वाक्षरी असलेला कॅन्सल चेक एखाद्याच्या हातात पडला तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. 


कॅन्सल चेकची गरज कुठे लागते?


· जर तुम्ही एखादी गुंतवणूक करत असाल तर KYCच्या नियमांनुसार तुम्हाला कॅन्सल चेक दयावा लागतो.


· म्यूचुअल फंड आणि भांडवली बाजारातील गुंतवणुकीसाठीही कॅन्सल चेक लागतो.


· जर तुम्ही बँकेतून लोन घेत असणार तर तुमच्या बँक खात्याच्या पडताळणीसाठी कॅन्सल चेक मागितला जातो.


· इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्विस (ECS) सुविधेसाठी तुम्हाला कॅन्सल चेक मागितला जातो.


· पीएफ अकाऊंटमधून तुम्हाला रक्कम काढायची असल्यास कॅन्सल चेकची गरज लागते.


· तुम्हाला विमा पॉलिसी काढायची असेल तर तुम्हाला संबंधित कंपनीला कॅन्सल चेक द्यावा लागतो.