Indian Railway News : देशातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या भागांना जोडण्याचं काम (Indian Railways) भारतीय रेल्वेकडून करण्यात येतं. आशियातील सर्वात मोठं आणि जगभरातील चौथ्या क्रमांकाचं हे महाकाय रेल्वेचं जाळं अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय. दरवर्षी कोट्यवधींच्या संख्येनं नागरिक या रेल्वेनं प्रवास करतात. मग हा प्रवास सांब पल्ल्याचा असो किंवा मग अगदी काही तासांचा. प्रवास होतो हे महत्त्वाचं. रेल्वे मार्गानं प्रवास करणं हे सर्वच उत्पन्न गटातील नागरिकांच्या खिशाला परवडणारं असतं. अशा या प्रवासासाठी प्रवाशांकडे तिकीट असणं गरजेचं असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर गेल्या काही वर्षांमध्ये कठोर कारवाई करण्यात आल्यामुळं आता अनेकजण रितसर तिकीट काढूनच प्रवास करण्याला प्राधान्य देतात. पण, प्रवासाला जाण्यापूर्वी अनेकदा इतका गोंधळ होतो की अनावधानानं हे तिकीटच हरवतं. कुठेतरी लक्षातही राहणार नाही अशा ठिकाणी आपण ते ठेवतो आणि विसरून जातो. पण, प्रवासात हीच सवय अडचणीची ठरू शकते. 


रेल्वेनं प्रवास करताना आयत्या वेळी तुमच्यावरही असाच प्रसंग ओढावला तर? दंड भरावा लागणार याच भीतीनं अनेकांच्या चेहऱ्याचा रंग उडतो. पण, यावरही उपाय आहेत हे तुम्हाला माहितीये का? 


पहिला पर्याय म्हणजे प्लॅटफॉर्म तिकीट 


प्लॅटफॉर्म तिकीट असल्यासही तुम्ही प्रवास करु शकता माहितीये का? काही कारणास्तव तुम्हाला तिकीट काढण्याचा वेळ मिळाला नाही आणि तातडीनं प्रवासाला निघायचं असल्यास तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीटवर रेल्वेमध्ये चढू शकता. ज्यानंतर रेल्वेमध्ये असणाऱ्या TTE शी संपर्क साधून तुम्ही रितसर तिकीट काढू शकता. हो पण, इथं तुम्हाला पेनल्टी म्हणूनही काही पैसे द्यावे लागतील. 


Duplicate Rail Ticket बनवण्याचा पर्याय 


प्रवासाच्या काही क्षणांपूर्वीच तिकीट हरवलं तरीही तुम्ही प्रवास करु शकता. यासाठी तुम्हाला ड्युप्लिकेट तिकीट बनवण्याचा पर्याय तुमच्याकडे असेल.  रेल्वेकडून विविध श्रेणींमधील तिकीटं विविध दरांना उपलब्ध करून दिली जातात. तिकीट काऊंटवर जाऊन तुम्ही हे Duplicate Ticket बनवू शकता. याविषयीची सविस्तर माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. 


हेसुद्धा पाहा : SBI Scheme : स्टेट बँकेकडून जास्तीत जास्त परतावा देणारी योजना; आताच पाहून घ्या किती मिळतंय व्याज


 


रिझर्व्हेशन चार्ट (Reservation chart) लागल्यानंतर तिकीट हरवल्याचं लक्षात आल्यास स्लीपर आणि सेकंड क्लाससाठी तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतात. यावरील श्रेणीतील तिकिटांसाठी तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतात. अखेरच्या क्षणी तुम्हाला तुमची Original Ticket मिळाल्यास तुम्ही जुनी आणि नवी ड्युप्लिकेट तिकीट Ticket Counter वर दाखवून दुसऱ्या तिकीटाचे पैसे परत घेऊ शकता. 


फक्त हरवलेल्या तिकीटासाठीच नव्हे, तर फाटलेल्या तिकीटासाठीसुद्धा रेल्वेकडून पर्याय दिला जातो. जिथं तुम्ही 25 रुपये भरून नवं तिकीट (Duplicate Rail Ticket) तयार करून घेऊ शकता. इथं वेटिंग लिस्टच्या तिकीटांसाठी मात्र हा नियम लागू नाही.