ATMमधून काढलेल्या नोटीला रंग लागला, तर काय करावे? माहित करुन घ्या
लोक त्यांना जेव्हा ही पैसे काढायचे असतील तेव्हा एटीएमचा वापर करतात.
मुंबई : लोक त्यांना जेव्हा ही पैसे काढायचे असतील तेव्हा एटीएमचा वापर करतात. कारण एटीएममुळे तुम्ही हवे तेव्हा आणि हवे त्या ठिकाणी पैसे काढू शकता. तसेच एटीएम ही पैसे काढण्याची सुरक्षित पद्धत देखील मानली जाते. परंतु एटीएममधून पैसे काढताना बर्याच वेळा लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळा पैसे येत नाहीत, तर कधी खराब नोटा येतात. बऱ्याच लोकांची तक्रार आहे की, एटीएममधून पैसे काढल्यानंतर त्यांना रंगीत नोट किंवा रंग लागलेली नोट मिळाली आहे, जी आता बाजारात चालत नाही. मग काय करता येईल?
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, या परिस्थितीत काय करता येईल आणि रंग लागलेल्या नोटांबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणते नियम सांगितले आहेत.
अलीकडेच एका ग्राहकाने ट्विटरवर या परिस्थितीबद्दल तक्रार केली होती आणि एसबीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग केले होते. त्याने एटीएममधून पैसे काढले आणि त्यामध्ये त्याला 500 ची नोट अशी मिळाली ज्याला रंग लागला होता. यावर स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा नोटीला काय करता येईल हे सांगितले आहे. मात्र पुढे बँकेने असेही म्हटले आहे की, बँकांच्या एटीएममधून अशा नोटा निघने अशक्य आहे.
अलीकडेच एका ग्राहकाने ट्विटरवर या परिस्थितीबद्दल तक्रार केली होती आणि एसबीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग केले होते. एटीएममधून पैसे काढले आणि 500 च्या रंगाची नोट सापडली अशी ग्राहकांची तक्रार आहे. यावर स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रतिक्रिया व्यक्त केली असून अशा नोट्सद्वारे काय करता येईल हे सांगितले आहे. मात्र बँकेने असेही म्हटले आहे की बँकांच्या एटीएममधून अशा नोटा काढणे अशक्य आहे.
एसबीआयचे उत्तर काय आहे?
एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे उत्तर दिले आहे की, 'प्रिय ग्राहक, चलन नोटी आमच्या एटीएममध्ये लोड करण्यापूर्वी अत्याधुनिक नोट सॉर्टिंग मशीनद्वारे तपासल्या जातात. म्हणून, रंग लागलेले किंवा खराब झालेले नोटा मशीनमध्ये येणे अशक्य आहे. परंतु असे झाल्यास तुम्ही आमच्या कोणत्याही शाखेतून आपला नोट बदलू शकता.
रंग लागलेल्या नोटीचे काय होईल?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार कोणतीही बँक रंगीत नोट स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही. परंतु आरबीआयने ग्राहकांना सल्ला देताना म्हटले आहे की, कोणीही नोटा खराब करू नये, त्यांना काळजीपूर्वक वापरा.
कोणत्या नोटी बदलल्या जावू शकत नाहीत?
रंग लागलेल्या नोटा या बँके कडून बदलून मिळतात. त्याचप्रमाणे फाटलेले किंवा जुण्या नोटी देखील तुम्ही बँकेकडू बदलून घेऊ शकता. यासाठी ग्राहकांकडून कोणताही शुल्क स्वीकारला जात नाही.
परंतु जळलेली किंवा खुपच तुकडे-तुकडे झालेली नोट मात्र बँकेकडून स्वीकारली जाणार नाही. जर बँक अधिकाऱ्याला वाटले की, तुम्ही मुद्दामुन ती नोट खराब केली किंवा फाडली असेल तर मात्र ग्राहकांना नोट बदलून मिळणार नाही.