मुंबई : दूरच्या प्रवासासाठी अनेक जण रेल्वेने प्रवास करतात. प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार, जनरल, स्लीपर, एसी या श्रेणींची तिकीट घेतो. पण जनरल बोगीत नेहमीच तुडूंब गर्दी असते. अनेकदा आपल्याला ठराविक ठिकाणी वेळेत पोहचणं गरजेचं असतं. पण नेमकी रेल्वेच्या जनरल डब्ब्याला गर्दी असते अन् आपल्याकडेही जनरल डब्ब्याची तिकीट असते. अशा वेळेत नाईलाज म्हणून स्लीपर किंवा एसी कोच मध्ये घुसतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, जर तुम्ही जनरल  तिकीट घेऊन स्लीपर किंवा एसी कोचमधून प्रवास केला तर तुम्हाला दंड द्यावा लागू शकतो. अशा परिस्थितीत टीटीई तुम्हाला दंड आकारू शकतो. तसेच दंड न भरल्यास तुम्हाला तुरूंगातही डांबले जाऊ शकते. तुमच्याकडे सामान्य श्रेणीचे तिकीट असल्यास आणि कोणत्याही कारणास्तव आपण स्लीपर क्लासमध्ये चढल्यास नियमांनुसार टीटीई तुम्हाला दंड आकारू शकतो.
 
जर तुम्ही नाईलाज म्हणून जर जनरलच्या तिकीटावर स्लीपर किंवा एसी कोचमध्ये चढला असाल, तर तात्काळ टीटीईशी संपर्क साधा आणि स्लीपर क्लासमध्ये चढण्यामागचे कारण सांगा. जर टीटीईने आपल्याद्वारे दिलेले कारण योग्य वाटलं, तर तो तुम्हाला दंड वसूल न करताही सोडू शकतो. पण यानंतर तुम्हाला पुढील स्टेशनवर जनरल डब्यात परतावं लागेल. तसंच जर तुम्हाला सामान्य डब्यात जायचं नसेल तर टीटीईकडून स्लीपर क्लासचे तिकीटही घेऊ शकता.


टीटीपासून लपू नका


वेळ कधी कशी येईल, अन जोखीम पत्कारुन स्लीपर किंवा एसीकोचने प्रवास करावा लागतो. अशावेळी आपण टीटीकडून नजर चूकवत असतो. पण असं न करता थेट टीटीला गाठून तुमची समस्या सांगा. जर तुम्हीएसी कोचमध्ये चढून टीटीची नजर चुकवत असाल, तर तुम्ही जाणीवपूर्वक कोचमध्ये चढल्याचं त्यातून सूचित होतं.  त्यामुळे तुम्ही जर आधीच टीटीला गाठून तुमची परिस्थितीबाबत सांगितलं तर, कदाचित टीटी सहानभूती दाखवून तुम्हाला सोडू शकतो.