मुंबई : भाजपाच्या वरिष्ट नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचं निधन झालं आणि सारा देश शोकसागरात बुडाला. त्या ६७ वर्षांच्या होत्या. ट्विटरवर त्या नेहमी सक्रीय असायच्या. नेहमी देशाच्या हितासाठी लढणाऱ्या सुषमा स्वराज यांनी अनुच्छेद ३७० रद्द झाल्याप्रकरणी ट्विटरच्या माध्यमातून आनंदही व्यक्त केला होता. तो त्यांचा अखेरचा ट्विट ठरला. काही दिवसांपूर्वी एका परदेशी महिलेने त्यांच्यासाठी 'इचक दाना बीचक दाना' गाणं गायलं होतं.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१८ मध्ये सुषमा स्वराज मध्य आशियातील कझाकस्तान, उझबेकिस्तान आणि किर्गिस्तान या तीन देशांच्या दौर्‍यावर होत. उझबेकिस्तान मध्ये सुषमा स्वराज यांची भेट एका स्थनीक महिलेसोबत झाली होती. तेव्हा त्या महिलेने त्यांच्यासाठी 'इचक दाना बीचक दाना' गाणं गायलं होतं. त्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.



सुषमा स्वराज यांच्या निधनाने फक्त नेतेमंडळी नाही तर कलाविश्व त्याचप्रमाणे भारतीय जनतेला सुद्धा मोठा धक्का बसला आहे. सुषमा स्वराज यांनी नेते, कार्यकर्ते, सामान्य जनता यांच्या मनात घर केले होते. फार कमी वयात मंत्री होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला होता. त्याचप्रमाणे त्या दिल्लीतल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री राहिल्या होत्या.