पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : जगात आपण प्रत्येक गोष्टीत प्रगती केलीय. तंत्रज्ञानाने (Technology) तर सतत संवाद सुधारण्याचे काम केलं आहे. इ. स. 1990 च्या दशकात, मजकूर संदेशाने संप्रेषण पूर्णपणे बदलले. एसएमएस (Short message service) हे त्या काळातील सर्वात जलद संवादाचे माध्यम होते. जगातील कोणत्याही कोपऱ्यात काही सेकंदात आपला संदेश आपण पाठवू शकतो. पहिला टेक्स्ट मेसेज (First text message) कधी आणि कोणाला पाठवला गेला हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया त्याची रंजक कहाणी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिला मजकूर संदेश
जगातील पहिला मजकूर संदेश 3 डिसेंबर 1992 रोजी पाठवण्यात आला होता. या संदेशमध्ये ख्रिसमसच्या शुभेच्छा (Merry Christmas) देण्यात आल्या होत्या. जगातील पहिला मजकूर संदेश मेरी ख्रिसमस होता आणि तो व्होडाफोन नेटवर्कद्वारे (Vodafone Network) पाठवला गेला होता. या संदेशात 14 अक्षरे होती. 


पहिला संदेश कोणाला पाठवला 
नील पापवर्थ (Neil Papworth) या व्होडाफोन (Vodafone engineer) अभियंत्याने त्याच्या संगणकावरून जगातील पहिला मजकूर संदेश (The world's first text message) रिचर्ड जार्विस (Richard Jarvis) यांना पाठवला होता. त्यांना नाताळच्या शुभेच्छा (Merry Christmas) दिल्या होत्या. रिचर्ड जार्विस यांना त्यांच्या ऑर्बिटल 901 हँडसेटवर (Orbital 901 handset) हा मजकूर संदेश प्राप्त झाला. रिचर्ड त्यावेळी कंपनीचे संचालक होते.  


एसएमएस तंत्रज्ञान आणि काम 
आजही पाठवण्यात आलेल्या दर तीन मजकूर संदेशांपैकी एक एसएमएसद्वारे (SMS) पाठविला जातो. म्हणजेच इतक्या वर्षांनंतरही एसएमएसची लोकप्रियता कमी झालेली नाही. तंत्रज्ञान प्रथम टेक्स्टचे सिग्नलमध्ये (Technology First Text Signals) रूपांतर करते, त्यानंतर हे सिग्नल प्रेषकाच्या जवळ असलेल्या टॉवरवर पाठवले जातात. त्यानंतर हे सिग्नल एसएमएस सेंटरला (Signal SMS Center) पाठवले जातात. येथून ते रिग्नल रिसीव्हरच्या टॉवरवर पोहोचते. शेवटी, हे सिग्नल पुन्हा मजकुरात रूपांतरित केले जातात आणि प्राप्तकर्त्याकडे पाठवले जातात. अशा पध्दतीने एसएमएस तंत्रज्ञान (SMS technology) काम करते.