मथुरा : योगगुरु बाबारामदेव हे हत्तीवर बसून योगासन करत होते. बाबा रामदेव हे एका सजवलेल्या हत्तीवर योगा करत होते. मथुरेत काही संतांसमोर हा योगा सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. पण सर्वांना तेव्हा अचानक धक्का बसला, जेव्हा बाबा रामदेव हे योगा करताना अचानक हत्तीच्या पाठीवरुन खाली पडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण योग शरीर असलेले बाबा रामदेव हे तेवढ्याच जोशाने ताडकन उभे राहिले. बाबा रामदेव यांना काही लागलं असेल, असं तुम्हाला व्हिडीओ पाहून वाटलं असेल, पण बाबा पडून उठल्यानंतर लहान मुलं पडल्यानंतर लगेच उठतात आणि हसतात तसे हसत होते.


एकंदरीत बाबा रामदेव यांचं शरीर एवढं लवचिक आणि मजबूत आहे की, हत्तीच्या पाठीवरुन खाली पडल्यानंतर त्यांना साधं खरचटलेलंही नाही. बाबा रामदेव हे हत्तीवरुन पडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.