Toilet In Train: ट्रेनमध्ये टॉयलेट कसं आलं? जाणून घ्या या मागची रंजक कहाणी
देशभरात रेल्वेचं जाळं पसरलं असून या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. लांब पल्ला गाठण्यासाठी सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं. काही वेळा योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी काही 24 तासांहून अधिक काळ लागतो. जर ट्रेनमध्ये टॉयलेट सुविधा नसती तर काय झालं असतं याचा तुम्ही विचार करा.
When Railways Start Toilet Facility: देशभरात रेल्वेचं जाळं पसरलं असून या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. लांब पल्ला गाठण्यासाठी सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं. काही वेळा योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी काही 24 तासांहून अधिक काळ लागतो. जर ट्रेनमध्ये टॉयलेट सुविधा नसती तर काय झालं असतं याचा तुम्ही विचार करा. रेल्वे सुरु झाल्यानंतर जवळपास 56 वर्षे यात टॉयलेटची सुविधा नव्हती. विचार करा त्या काळात प्रवास करणं किती अडचणीचं होत असेल. तेव्हा ट्रेनचा वेगही कमी असायचा. त्यामुळे अनेकाना प्रवासादरम्यान त्रास व्हायचा. या त्रासाला कंटाळलेल्या एका भारतीयाने इंग्रजांना पत्र लिहून ही समस्या मांडली. त्यानंतर इंडियन रेल्वेने यावर विचार करण्यास सुरुवात केला.
56 वर्षे ट्रेन विना टॉयलेट धावत होती
भारतीय रेल्वेची सुरुवात 1853 साली झाली होती. 6 एप्रिल 1853 साली पहिली प्रवासी ट्रेन मुंबई ते ठाणादरम्यान धावली. तेव्हापासून रेल्वेचं जाळं विस्तारत गेलं. मात्र 56 वर्षे ट्रेनमध्ये टॉयलेटची सुविधा नव्हती. 1919 पर्यंत अशीच स्थिती होती. त्यानंतर ओखिल चंद्र सेन नावाच्या प्रवाशाने इंग्रजांना पत्र लिहिलं आणि आपली समस्या सांगितली. त्यांनी हे पत्र 2 जुलै 1909 ला लिहिलं होतं. यात भारतीय रेल्वे कोचमध्ये टॉयलेट लावण्याची सूचना करण्यात आली होती.
Debit Card घरी विसरलात तरी चिंता नसावी, अशा पद्धतीने काढाल एटीएममधून पैसे
पत्रात काय लिहिलं होतं?
डियर सर,
मी ट्रेनमधून अहमदपूर स्टेशनवर आलो आणि या दरम्यान माझ्या पोटात दुखत होतो. त्यामुळे माझ्या पोटाला सूज आली. मी टॉयलेट करण्यासाठी प्लॅटफॉर्मजवळच किनाऱ्यावर बसलो. मात्र गार्डनं सीटी वाजवली आणि ट्रेन सुटली. ट्रेन पकडण्याठी मी एका हातात तांब्या आणि दुसऱ्या हाताने धोतर पकडून धावत सुटलो. या दरम्यान मी फलाटावर पडलो. माझं धोतर सुटलं आणि लोकांसमोर अब्रू गेली आणि ट्रेनही सुटली. त्यामुळे मला अहमदपूर स्टेशनवरच राहावं लागलं. टॉयलेटला गेलेल्या एका प्रवाशासाठी रेल्वे गार्डने ट्रेन काही मिनिटांसाठी थांबवली नाही हे किती वाईट आहे. मी तुम्हाला विनंती करतो की त्याला दंड करा अन्यथा मी ही गोष्ट पत्रकारांना सांगेन.
तुमचा विश्वासू सेवक, ओखिल चंद्र सेन