मुंबई: राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सोमवारी मोठा निर्णय घेण्यात आला.  वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून दंड आकरण्यात येतो. वाहनांचे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण थांबविण्यासाठी सरकारकडून नव्या योजना राबवल्या जातात. मागील २ महिन्यांत राज्यात १२ हजार वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच वाहनधारकांना त्यांच्या विम्याचा कालावधी किती दिवस शिल्लक आहे, हे देखील कळणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बैठकीत ही माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहनधारकांना त्यांचा विमा कधी संपणार याची माहिती आता मिळणार आहे. वाहनधारकांना पत्राद्वारे तशी सूचना पाठवण्यासाठी यंत्रणा निर्माण केली जाणार आहे. राज्यातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नवीन यंत्रणा निर्माण केल्याने राज्यातील तरुणांना रोजगार मिळेल. तसेच वाहनधारकांना देखील याचा फायदा होईल.


विमा न उतरवलेले किंवा विम्याची मुदत संपलेले वाहन रस्त्यावर आल्यास आणि त्याला अपघात झाल्यास जखमी किंवा मृत व्यक्तीस कोणत्याही प्रकारचा विमालाभ मिळत नाही. सध्या अशा वाहनचालकांकडून दंड आकरण्यात येतो. आता अशी वाहने रस्तावर आढळल्यास जागेवरच जप्त करण्यात येणार आहेत. वाहनधारकाने विमा काढल्यावर आणि दंड भरल्यानंतरच त्याला वाहन परत मिळणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले की, कायदाचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांना अद्दल घडावी म्हणून सरकार प्रयत्न करत आहे.