नवी दिल्ली : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. इंडियन मेडिकल असोशिएशन कॉउंसिल ऑफि मेडिकल रिसर्चने म्हटले आहे की, देशात कोरोनाची तिसरी लाट उशीरा येईल. ICMRने आपल्या अभ्यासाच्या आधारावर हा दावा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड वर्किंग गृपचे चेअरमन डॉ. एन के अरोडा यांनी म्हटले आहे की, आपल्याकडे 6 ते 8 महिन्यांचा वेळ आहे. ज्यामध्ये सर्व लोकांच्या लसीकरणावर फोकस असला पाहिजे. तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये दररोज एक कोटी लोकांच्या लसीकरणाचे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यांनी म्हटले की, Zydus Cadila लसीचे ट्रायल जवळपास पूर्ण झाले आहे. जुलैच्या शेवटापर्यंत 12 ते 18  वयोगटातील लहान मुलांना आपण लसीचे डोस देऊ शकतो.


शाळा केव्हा उघडतील ? एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी दिलं हे उत्तर


नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या सुरूवातीपासून शाळा महाविद्यालये बंद आहेत. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शाळा - महाविद्यालये सुरू व्हायला सुरूवात झाली होती. दुसऱ्या लाटेचा कहर सुरू झाल्याने पुन्हा सर्व शाळा महाविद्यालये बंद झाली आहेत. 


अशातच सर्व पालकांचा तसेच विद्यार्थ्यांना मोठा प्रश्न पडला आहे की, शाळा नक्की सुरू होणार तरी कधी? AIMSचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी लहान मुलांचे लसीकरण झाल्यानंतरच शाळा सुरू होण्याच्या शक्यता वर्तवल्या आहेत.


गुलेरिया यांनी म्हटले की, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे दुसऱ्या तसेच तिसऱ्या चाचणीचे परिक्षण सप्टेंबर पर्यंत येण्याची शक्यता आहे. ड्रग कंन्ट्रोलर च्या मंजूरी नंतर लहान मुलांसाठी लसीचे डोस उपलब्ध होऊ शकतील.