नवी दिल्ली : आयस्क्रीम कोणाला आवडत नाही? अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच आयस्क्रीम आवडतं. तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचं आयस्क्रीम खाल्लं असेल पण कधी सोन्याचं आयस्क्रीम खाल्लं आहे का? तुम्ही आजवर सोन्याच्या वेगवेगळ्या दागिन्यांबद्दल ऐकलं असेल. पण कधी सोन्याचं आईस्क्रीम खाल्लंय का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईसक्रीमची चव चाखण्याची मजाच काही वेगळी असते. पण आता या आईसक्रीममध्ये गोल्डन फ्लेव्हरही आलाय बरं का? तोही अगदी खराखुरा. सोशल मीडियात सोन्याच्या आईसक्रीमचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.



पाहिलंत या व्हिडीओ दिसणारी व्यक्ती गोल्ड प्लेटेड आईसक्रीम बनवत आहे. आधी तो एका चॉकलेट कोनमध्ये आईस्क्रीम भरतो. त्यानंतर या आईसक्रीमवर तो सोन्याचा वर्ख असलेला कागद लावतो.


24 कॅरेट गोल्ड सोन्याचं हे आईस्क्रीम हैदराबादच्या एका कॅफेमध्ये बनवलं जात असल्याचा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. या आईसक्रीमची किंमत 500 रूपयांपेक्षा जास्त आहे. याशिवाय अतिरिक्त टॅक्सही द्यावा लागतो. 


सोशल मीडियात जवळपास 40 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेकांनी हे आईसक्रीम स्वादिष्ट असल्याचं म्हंटलंय तर अनेकांनी आईसक्रीमची चव चाखण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ हैदराबादचा असल्याचंही सांगितलं जात आहे.