मुंबई: आपण रोजच्या व्यवहारात चलनी नोटांचा वापर करतो. या चलनी नोटा कागदाच्या असल्याचं आपल्याला वाटतं. मात्र या नोटा तयार करण्यासाठी कागदाचा वापर केला जात नाही. कागदाचा वापर करून चलनी नोटा तयार केल्या जात नाही, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं आहे. भारतासह इतर अनेक देशांचे चलन बनवण्यासाठी कॉटनचा वापर केला जातो. कॉटन वजनाने हलक, दीर्घकाळ टिकतंअसणे आणि छापण्यायोग्य असल्याने त्याचा वापर केला जातो. आरबीआयच्या म्हणण्यानुसार नोट छापण्यासाठी 100% कॉटन वापरला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चलनी नोटा बनवण्यासाठी, कापूस, लिनन आणि इतर गोष्टींचे प्रमाण गुप्त ठेवले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 च्या कलम 22 नुसार, भारतात नोटा जारी करण्याचा एकमेव अधिकार फक्त रिझव्‍‌र्ह बँकेला आहे, म्हणजेच जर कोणी तसे करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. भारतीय चलनात सध्या 5, 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या चलनी नोटा आहेत.


युनायटेड स्टेट्स देखील आपल्या चलनी नोटांसाठी असे प्रमाण वापरते. एका अहवालानुसार, यात 75% कापूस आणि 25% लिनेनचा वापर केला जातो. याचा अर्थ अमेरिकाही हे सूत्र पाळते.