नवी दिल्ली : पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) आणि नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) हे दीर्घ गुंतवणूकीसाठी योजना आहेत. खरं तर दोन्ही योजनांचे उद्देश वेगवेगळे आहेत. एनपीएस ही पूर्णतः निवृत्ती योजना आहे. त्यात पैसे गुंतवल्यानंतर वयाच्या 60 व्या वर्षानंतर दरमहा पेन्शन मिळते. पीपीएफ द्वारे पेन्शन प्राप्त करण्यासाठी तुम्हाला मॅच्युरिटीनंतरसुद्धा खाते सुरू ठेवावे लागते. 


पीपीएफ आणि एनपीएसमध्ये काय फरक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीपीएफ 100 टक्के डेट गुंतवणूक आहे. म्हणजेच तुमचा पैसा बॉन्ड्स वेगैरेमध्ये लागलेला असतो. तर एनपीएसमध्ये डेट आणि इक्विटी दोन्हींचे भाग असतात. एनपीएस गुंतवणूकदारांकडे पर्याय असतो की, ते इक्विटीचा हिस्सा 75 टक्केपर्यंत ठेऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदाराची रिस्क घेण्याची क्षमता जास्त असेल तर, डेट आणि इक्विटी 50 -50 टक्के ठेऊ शकतात. दीर्घ काळानंतर 10 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. हाच परतावा पीपीएफमध्ये 7.1 टक्केच्या आसपास मिळतो.


एनपीएसमध्ये मॅच्युरिटीनंतरसुद्धा कमीतकमी 40 टक्के हिस्सा एन्यूटीमध्ये जमा करणे अनिवार्य असते. एन्यूटीच्या माध्यमातून निवृत्तीनंतर पेन्शन मिळते.