भारताचं मोठं पाऊल, WHO सोबत मोठा करार
WHO ने पारंपारिक औषधांसाठी US$250 दशलक्षाची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : भारत सरकारच्या (Government of India) आयुष मंत्रालयाने शनिवारी भारतातील पारंपारिक औषधांच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे मंत्रालयाने गुजरातमधील जामनगर येथे WHO ग्लोबल सेंटरच्या स्थापनेसाठी जागतिक आरोग्य संघटनेसोबत करार केला आहे. आयुष मंत्रालयाच्या या निर्णयाचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, डब्ल्यूएचओ ग्लोबल सेंटर आपल्या समाजाचं आरोग्य वाढवण्याचं काम करेल.'
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वतीने असे सांगण्यात आले आहे की, WHO आणि भारत सरकारने आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे पारंपारिक औषधांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी WHO ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनची स्थापना करण्यास सहमती दर्शविली आहे. पारंपारिक औषधांसाठी US$250 दशलक्ष गुंतवणूक केली जाईल. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी जगभरातील पारंपारिक औषधांच्या संभाव्यतेचा प्रचार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिनच्या (Global Centre for Traditional Medicine) स्थापनेसाठीच्या करारावर स्वाक्षरी झाल्याबद्दल मला आनंद होत आहे. गुजरातमधील जामनगर येथे WHO-GCTM च्या स्थापनेसाठी आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्यात झालेला करार हा एक स्तुत्य उपक्रम आहे. भारतातील पारंपारिक औषधे आणि आरोग्य पद्धती जागतिक स्तरावर खूप लोकप्रिय आहेत. हे केंद्र आपल्या समाजात निरोगीपणा वाढवण्यासाठी खूप पुढे जाईल.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की जगातील सुमारे 80% लोकसंख्या पारंपारिक औषधांचा वापर करते. तसेच 170 देश सध्या पारंपारिक औषधांचा अवलंब करत आहेत. या देशांच्या सरकारांनी पारंपारिक औषध पद्धती आणि उत्पादनांवर विश्वास व्यक्त केला आहे आणि या क्षेत्रात WHO च्या पाठिंब्यासाठी आवाहन केलं आहे.
डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अॅधानोम घेब्रेयसस (Dr. Tedros Adhanom Ghebreyesus) म्हणाले की, सर्व लोकांना सुरक्षित आणि प्रभावी उपचार देणे हे WHO चे ध्येय आहे. हे केंद्र तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपारिक औषधांना प्रोत्साहन देईल. भारत सरकारच्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्याला यशस्वी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.