मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organisation - WHO) चे महासंचालक (Director) टी.ए. गेब्रेयेसस (Tedros Adhanom Ghebreyesus)यांनी भारताचं कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींची आभार मानले आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी जागतिक स्तरावर सुरू असलेल्या भागीदारीबाबत पंतप्रधान मोदी आणि WHO यांची बुधवारी चर्चा झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चर्चेत WHO ने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोवॅक्स (Covax) आणि कोरोनालसीबाबत उचलेले पाऊल हे जागतिक पातळीवर कौतुकास्पद असल्याचं म्हणत आभार मानले आहेत. यावेळी आधुनिक वैद्यकीय पद्धतीसोबत पारंपारिक औषधांचा समावेश करण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. 




टी.ए. गेब्रेयेसस यांनी म्हटलं की, 'पंतप्रधाव मोदींसोबत खूप महत्वाचा फोन कॉल झाला. या चर्चेदरम्यान नरेंद्र मोदींनी कोरोनावर मात करताना अन्य रोगांविरूद्धच्या लढाईत सुद्धा लक्ष विचलित होऊ नये, यावरही भर दिला. विकसनशील देशांमध्ये आरोग्य यंत्रणेला संघटनेने दिलेल्या पाठिंब्याचे महत्त्वही त्यांनी व्यक्त केले.'



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील WHO चे आभार मानले आहेत. यावेळी जागतिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी पारपंरिक औषधांची किती मदत होते यावर चर्चा करण्यात आल्याचं मोदींनी म्हटलं.