Who is Anil Ambani Son Jai Anmol Ambani: गेल्या बऱ्याच काळापासून अनिल अंबानी म्हणजेच मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू त्यांच्या व्यवसायामध्ये दणक्यात कमबॅक करताना दिसत असून, त्यांच्या दिवाळखोरीच्या दिशेनं गेलेल्या एका कंपनीला खरेदीदारही मिळाल्याचं वृत्त मागील काही दिवसांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं होतं. एकिकडे अनिल अंबानी यांना ब्रिटनमधील न्यायालयाकडून दिवाळखोर घोषित केलेलं असतानाच दुसरीकडे आता त्यांना या संकटातून तारण्यासाठी खुद्द त्यांचाच मुलगा उभा राहिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल आणि टीना अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानी सध्या या उद्योगसमुहासाठी आशेचा किरण ठरताना दिसत आहे. मुख्य प्रकाशझोतापासून दूर असणाऱ्या जय अनमोल अंबानी यानं त्याचा संपूर्ण उद्योग आता एकत्रित करण्यास सुरुवात केली असून, येत्या काळात या व्यवसाय विस्तारीकरणासाठी तो काही महत्त्वाकांक्षी बेतही आखताना दिसणार आहे. 


नुकताच अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चर कंपनीची सुरुवात करण्यात आली असून, त्याअंतर्गतच आता जय प्रॉपर्टीज प्रायवेट लिमिटेड (RJPPL)ची सुरुवात करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर, येत्या काळात अनिल अंबानी ईवी व्हीकल्स क्षेत्रातही नव्यानं एंट्री करताना दिसतील. ज्याअंतर्गत इलेक्ट्रीक कार आणि बॅटरी तयार करण्यासाठीच्याही योजना सध्या युद्धपातळीवर आखल्या जात आहेत. 


जय अनमोलचं महत्त्वपूर्ण योगदान 


वडिलांचा डगमगलेला व्यवसायाचा डोलारा पुन्हा उभा करण्यासाठी जय अनमोल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यानं नव्या रणनितीच्या बळावर जपानमधील गुंतवणुकीलाही आकर्षित केलं असून, शेअर बाजारामध्येही नव्यानं उसळी मारण्यास सुरुवात केली आहे. परिणामी अनिल अंबानी या नावापुढं त्यांच्याच लेकामुळं एक नवं वलय तयार होत आहे. 


हेसुद्धा वाचा : Maruti ची पहिली EV बजेटही सांभाळणार अन् पर्यावरणही; कधी लाँच होणार, कधी खरेदी करता येणार? पाहा Updates 


मुंबईतील कॅथेड्रेल आणि जॉन कॉननमधून शिक्षण घेतल्यानंतर जय अनमोल ब्रिटनमधील वन ओक्स स्कूलमधून शिक्षण घेत करिअरच्या वाटेवर निघाला आणि त्यानं व्यवसायाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली. वयाच्या 18 व्या वर्षी त्यानं रिलायंस म्यूचुअल फंडमध्ये इंटर्नशिप सुरु केली. ज्यानंतर रिलायन्स कॅपिटलमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली. 


निर्णयक्षमतेच्या बळावर जय अनमोल अंबानीनं एकूण संपत्तीचा आकडा 3.3 अब्ज डॉलर अर्थात 2000 कोटी रुपयांपर्यंत नेला. ईशा अंबानीकडे असणाऱ्या 831 कोटींच्या संपत्तीहून हा आकडा मोठा असून, जय अनमोल प्रसिद्धीपासून दूर असला तरीही व्यवसाय क्षेत्राच्या बाबतीत मात्र तो आपल्या भावंडांना चांगलीच टक्कर देताना दिसत आहे.