वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी पंतप्रधान मोदींनी एनडीएतील नेत्यांची भेट घेतली. मोदींनी उमेदवारी अर्ज भरताना आपल्या एका अनुमोदक असलेल्या वृद्ध महिलेचा आशीर्वाद घेतला. पंतप्रधानांचे अनुमोदकांमध्ये पाणिनी कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्य अन्नपूर्णा शुक्ला देखील आहेत. पीएम मोदींनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अन्नपूर्णा शुक्ला यांचा आशिर्वाद घेतला. ९१ वर्षाच्या अन्नपूर्णा शुक्ला या काशी महिला महाविद्यालयात ४० वर्ष शिक्षिका होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी पीएम मोदींनी मणिकर्णिका घाट निवासी डोमराजा यांचा मुलगा जगदीश चौधरी, हुकुलगंजचे राहणारे संघाचे आणि आणि पक्षाचे जुने कार्यकर्ते सुभाष गुप्ता, एमबीबीएस डॉक्टर अन्नपूर्णा शुक्ला, प्रोफेसर रमाशंकर पटेल आणि एक चौकीदार देखील आहे. ज्यांचं नाव राम शंकर पटेल आहे.


उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, 'मी काशीच्या लोकांचा आभारी आहे. ५ वर्षानंतर काशीच्या लोकांनी पुन्हा एकदा मला आशीर्वाद दिला आहे. बाबांची नगरी, गंगेचा आशीर्वाद घेत पुन्हा एकदा विकासाचा संकल्प घेतला आहे. लोकांनी मतदान करावं.' पंतप्रधान मोदींनी यावेळी मीडियाचे देखील आभार मानले.


शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींनी कार्यकर्त्यांना देखील संबोधित केले. 'अनेकांनी मला सांगितलं की, रोड शो करु नका. सुरक्षेच्या काळजी घ्या. पण देशातील करोडो माता मोदींची काळजी घेतात. त्यांची शक्ती माझं सुरक्षाकवच आहे. पहिल्यांदा देशात सत्तेत असलेल्या पक्षाच्या बाजुने वातावरण आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशात उत्साह आहे. सगळेच म्हणत आहे की, पुन्हा एकदा मोदी सरकार'