दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणात अनेकदा काश्मीरचा मुद्दा येतो. काश्मीरबाबत भारताला गोत्यात आणण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत (UNGA) त्यांनी पुन्हा तोच प्रयत्न केला. मात्र यावेळी भारताच्या तरुण अधिकाऱ्याने इम्रान खानला अशा प्रकारे फटकारलं की ही गोष्ट ते क्वचितच विसरू शकतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) इम्रान खान म्हणाले की, भारताला काश्मीरच्या डेमोग्राफीमध्ये बदल करण्याची इच्छा आहे. फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचा शहीद म्हणून उल्लेख करताना ते असेही म्हणाले की, जम्मू -काश्मीर वादाचे समाधान केल्यास दोन्ही देशांमध्ये शांतता येईल. यानंतर संयुक्त राष्ट्र महासभेत भारताच्या पहिल्या सचिव स्नेहा दुबे यांनी दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानला घेरत सडेतोड उत्तर दिलंय.


Sneha Dubey यांंनी दिली सडेतोड उत्तरं


स्नेहा दुबे, राइट-टू-रिप्लाई वापर करत म्हणाली, "पाकिस्तानच्या नेत्याने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा वापर करून माझ्या देशाविरुद्ध खोटा आणि दुर्भावनापूर्ण प्रचार पसरवण्याची ही पहिली वेळ नाही. पाकिस्तानी नेते जगाचं लक्ष आपल्या देशाच्या दु:खी अवस्थेकडून दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, जिथे दहशतवादी मुक्तपणे फिरतात. तर सामान्य नागरिक, विशेषत: अल्पसंख्यांक समाजातील लोकांवर अत्याचार होतात.


स्नेहा 2012बॅचच्या IFS आहेत


इम्रान खानला संपूर्ण जगासमोर आरसा दाखवणाऱ्या स्नेहा दुबे यांनी पहिल्याच प्रयत्नातच यूपीएससीमध्ये यश मिळवलं. त्या 2012च्या बॅचची महिला IFS अधिकारी आहे. आयएफएस झाल्यानंतर त्यांची परराष्ट्र मंत्रालयात नियुक्ती झाली. यानंतर त्यांना 2014 मध्ये माद्रिद येथील भारतीय दूतावासात पाठवण्यात आले. सध्या त्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताच्या पहिल्या सचिव आहेत.


दिल्ली आणि पुण्यातून शिक्षण घेतलं


स्नेहा यांना सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय बाबींमध्ये रस होता, म्हणून त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला. स्नेहा यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू), दिल्ली येथून एमए आणि एमफिल केलं आहे. मात्र, त्यांचं सुरुवातीचं शिक्षण गोव्यात झालं आहे. यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी प्राप्त घेतली. 


स्नेहाला सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय बाबींमध्ये रस होता, म्हणून तिने भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला. स्नेहाने जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू), दिल्ली येथून एमए आणि एमफिल केले आहे. मात्र, त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गोव्यात झाले. यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. नागरी सेवांमध्ये प्रवेश करणारी स्नेहा दुबे कुटुंबातील पहिली सदस्य आहे.


संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत बोलताना स्नेहा दुबे म्हणाल्या की, पाकिस्तानला दहशतवाद्यांना त्यांना पाठिंबा देण्याचा इतिहास आहे. याची अनेक देशांना जाणीव आहे. हे त्याचं धोरण आहे. 


त्या पुढे म्हणाल्या की, हा असा देश आहे जो दहशतवाद्यांना पाठिंबा देण्यासाठी, शस्त्रास्त्रं पुरवण्यासाठी आणि आर्थिक मदत पुरवण्यासाठी जागतिक स्तरावर ओळखला गेला आहे.