तीरथ सिंह रावत उत्तराखंड नवे मुख्यमंत्री, जाणून घ्या कोण आहेत तीरथ सिंह रावत
तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत.
नवी दिल्ली : तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्या नावावर उत्तराखंड भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बुधवारी सकाळी झालेल्या बैठकीत सहमती दर्शविली गेली, मंगळवारी त्रिवेन्द्रसिंग रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि आता तिरथसिंह रावत यांची उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत.
तीरथसिंह रावत यांचे संघाशी जुने संबंध आहेत. ते संघाचे स्वयंसेवक आणि प्रचारक आहेत. ते संघातून भारतीय जनता पक्षात आले आहेत. उत्तराखंड भाजपमध्ये गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या राजकीय गदारोळानंतर मुख्यमंत्री त्रिवेन्द्रसिंह रावत यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तीरथसिंह रावत म्हणाले की, आपल्यावर अशी मोठी जबाबदारी येईल आणि एक दिवस आपण राज्याचे मुख्यमंत्री होऊ अशी कधी कल्पनाही केली नव्हती. या जबाबदारीबद्दल त्यांनी केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानले.
तीरथसिंह रावत म्हणाले की, मी केंद्रीय नेतृत्व, पंतप्रधान, राष्ट्रीय अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो. ते म्हणाले की, आरएसएसमध्ये रुजू झाल्यानंतर मी बरीच वर्षे विस्तारक म्हणून काम करत होतो, विद्यार्थी परिषदेशी जोडलो गेलो. संघटना मंत्री म्हणून जबाबदारी सोपविली. ते म्हणाले की मी अटलजींना पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला भाजपाची माहिती नव्हती, माझी पहिली ओळख भाजपशी झाली.
तीरथसिंह रावत यांचा जन्म 9 एप्रिल 1964 रोजी पौरी येथे झाला. ते 9 फेब्रुवारी 2013 ते 31 डिसेंबर 2015 पर्यंत उत्तराखंड भाजपचे अध्यक्ष होते. 2012 ते 2017 पर्यंत ते आमदारही होते. 2007 मध्ये ते उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सदस्य देखील होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पौरी-गढवाल जागा जिंकली आणि लोकसभेचे सदस्य झाले.