Indian Man In FBI Wanted List: भारत सरकारसाठी काम करणाऱ्या विकास यादवविरोधात अमेरिकन सरकारी संस्थांनी गंभीर आरोप केले आहेत. कॅनडामधील खलिस्तान समर्थक शीख फुटीरतावादी नेता गुरपतवंत सिंग पन्नूच्या फसलेल्या हत्येच्या कटामध्ये विकास यादव सहभागी होता असा आरोप अमेरिकेने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाच हा कट रचण्यात आला होता, असा अमेरिकी अधिकाऱ्यांचा दावा आहे. 


सचिवालयात कार्यरत होता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील न्याय विभागाने गुरुवारी विकास यादव या 39 वर्षीय भारतीयाविरोधात गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप निश्चित केलेत. विकास यादव हा भारतीय सचिवालयामध्ये कार्यरत होता. यामध्ये भारताच्या परदेशी गुप्तचर विभागाचा म्हणजेच रिसर्च अॅण्ड अॅनलिसिस विंग म्हणजेच 'रॉ'चा समावेश होतो. 


भारताची पहिली प्रतिक्रिया


गुरुवारी नवी दिल्लीमध्ये, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयसवाल यांनी यासंदर्भातील अमेरिकेने जारी केलेल्या या नोटीसनंतर पहिली प्रतिक्रिया नोंदवली. अमेरिकी कायदे विभागाने दाखल केलेल्या याचिकेमध्ये गुन्हेगारी ठपका ठेवण्यात आलेली व्यक्ती आता भारत सरकारसाठी काम करत नाही, असं जयसवाल यांनी म्हटलं आहे. अमेरिकी गुप्तचर यंत्रणा असलेल्या फेड्रल ब्युरो ऑफ इनव्हेस्टीगेशन म्हणजेच एफबीआयच्या वॉण्टेड आरोपींच्या यादीमध्येही विकास यादवचा समावेस आहे.


विकास यादववर कोणते आरोप ठेवण्यात आलेत पाहूयात...


> विकास यादववर, 'पैसे घेऊन हत्येचा कट रचणे, मनी लॉण्ड्रींग' असा ठपका ठेवण्यात आला आहे. खलिस्तान समर्थक शीख फुटीरतावादी नेता गुरपतवंत सिंग पन्नूच्या फसलेल्या हत्येच्या कटामध्ये विकास यादव सहभागी होता. 


> विकास यादवला अमेरिकी गुप्तचर यंत्रणेनं सीसी-वन दर्जाचा गुन्हेगार असल्याचं म्हटलं आहे. विकास यादव फरार असल्याचं अमेरिकी न्याय विभागाने सांगितलं आहे.


> प्रतिवादी, एक भारतीय सरकारी कर्मचारी असून कथितपणे गुन्हेगारी सहकाऱ्यासह त्याने अमेरिकेच्या भूमीवर कट रचला. त्याने अमेरिकेच्या नागरिकाच्या हत्या करण्याचा प्रयत्न केला, असं एफबीआयचे निर्देशक ख्रिस्तोफर वराय यांनी म्हटलं आहे. 


> विकास यादव हा गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येच्या कथित कटात खटल्याला सामोरे जाण्यासाठी चेक प्रजासत्ताक देशात अटक करण्यात आलेल्या निखिल गुप्ता नावाच्या व्यक्तीचा गुन्हेगारी सहकारी आहे. निखिल गुप्ताला गेल्या वर्षी चेक प्रजासत्ताकमध्ये अटक करण्यात आली होती आणि प्रत्यार्पणानंतर तो सध्या अमेरिकेच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.



> अमेरिकी ऍटर्नी जनरल मेरिक बी गारलँड यांनी विकास यादवविरोधातील आरोपांचं समर्थन केलं आहे. "हे ताजे आरोप हे दर्शवितात की न्याय विभाग अमेरिकन लोकांना लक्ष्य करण्याचा किंवा त्यांचा जीव धोक्यात आणण्याचा प्रयत्न सहन करणार नाही. प्रत्येक अमेरिकन नागरिकाचा हक्क जपण्याचा आमचा प्रयत्न आहे," असं गारलँड म्हणाले.


> एफबीआयने विकास यादवचे तीन फोटो असलेले ‘वॉन्टेड’ पोस्टरही जारी केलेत. विकास यादवविरुद्ध अटकेचे फेडरल वॉरंट 10 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलं आहे, असं एफबीआयचं म्हणणं आहे. 


> विकास यादव हा 'विकास' आणि 'अमानत' नावानेही ओळखला जातो. गुरपतवंत सिंग पन्नूच्या फसलेल्या हत्येच्या खटल्यासंदर्भात आरोप लावलेला दुसरी व्यक्ती आहे.


> 'यादवने त्याचं पद 'सुरक्षा व्यवस्थापन' आणि 'गुप्तचर यंत्रणे'संदर्भातील जबाबदाऱ्यांचं असून आपण 'वरिष्ठ क्षेत्र अधिकारी' असल्याचा दावा केलेला. यादवने यापूर्वी भारताच्या केंद्रीय राखीव पोलीस दलातही काम केले आहे. ‘बॅटल क्राफ्ट’ आणि ‘शस्त्रे’ यांमध्ये ‘अधिकृत प्रशिक्षण’ घेतले आहे. यादव हा भारतीय नागरिक आणि रहिवासी आहे. त्याने पीडित व्यक्तीच्या हत्येचा कट भारतातून रचला,” असे अमेरिकेने केलेल्या आरोपात म्हटले आहे.


> विकास यादवच्या एका छायाचित्रात लष्करी गणवेशात दिसतो. मात्र त्याच्याकडे कोणतंही लष्करी पद नव्हतं. तो मूळ सीआरपीएफचा जवान होता. तो 'असिस्टंट कमांडंट' होता असे अमेरिकेच्या आरोपात म्हटले आहे.


> अमेरिकेने जारी केलेल्या 18 पानी आरोपपत्रमध्ये न्यूयॉर्कमधील कारमध्ये दोन व्यक्ती डॉलर्सची देवाणघेवाण करत असल्याचे चित्र देखील देण्यात आलं आहे. हत्या करण्यासाठी निखिल गुप्ता आणि विकास यादव यांच्या वतीने एका व्यक्तीने कथित मारेकऱ्याला पैसे दिले होते, असा दावा अमेरिकने केला आहे.